कोल्हापूर: शिवसेना शिंदे गटाचे पहिले महाअधिवेशन कोल्हापुरात उद्या १६ व १७ फेब्रुवारी रोजी येथील महासैनिक दरबार प्रांगणात पार पडणार असून त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अधिवेशनाला शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पक्षाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर व शिवसेना नाव व चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. यानंतर शिवसेनेचे पहिले महाअधिवेशन कोल्हापूरमध्ये पार पडत आहे. यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री शिंदे हे श्री करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन अधिवेशनाला सुरुवात करणार आहेत.

हेही वाचा – कोल्हापुरात सराफांना दणका; बंगाली कारागिराने दीड किलो सोने लांबवले

अशी आहे रूपरेखा

शुक्रवारी पहिल्या सत्रात पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा होणार आहे. दुसऱ्या सत्रात सर्व ठराव मंजूर करण्यात येणार आहेत. तिसऱ्या सत्रामध्ये आगामी निवडणुकांच्या तयारी संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तर शनिवारी सायंकाळी गांधी मैदान येथे जाहीर सभा पार पडणार असून मुख्यमंत्री शिंदे काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – ठाकरे सेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’; शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्याचे संकेत

कोल्हापूर भगवेमय

यासाठी भव्य मंडप उभे करण्यात आले आहे. शहरात शिवसेनेचे झेंडे व मुख्यमंत्री शिंदे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे बॅनर, भगवे झेंडे, कटआउट लावण्यात आले आहेत.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First convention of shivsena in kolhapur from tomorrow ssb