लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर: राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत ४.४ मेगावाटचा कुंभोज (ता. हातकणंगले) येथील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प शनिवारी कार्यान्वित करण्यात महानिर्मितीला यश आले आहे. रात्री सिंचन करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शेतीसाठी दिवसा भरवशाचा वीज पुरवठा व्हावा यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे.

या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे कुंभोज आणि हिंगणगाव या दोन गावातील सुमारे १५०० कृषी वीज ग्राहकांना सौर ऊर्जेचा लाभ होऊन, विशेषतः ५ एच.पी.चे सुमारे १०४० कृषी पंप उर्जित होणार आहेत. सुमारे ९ हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यासाठी १८ कोटी खर्च आला आहे. महानिर्मिती, मेसर्स ई.ई.एस.एल.(विकासक), मेसर्स टाटा (सब व्हेंडर) आहेत. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने महानिर्मितीची एकूण सौर ऊर्जा स्थापित क्षमता ३७६.०२ मेगावाट इतकी झाली आहे. स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ४० व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे. सौर ऊर्जेद्वारे वीज सुमारे ३.३० रुपये प्रती युनिट दराने महावितरण समवेत वीज खरेदी करार करण्यात आला आहे.

आणखी वाचा-इचलकरंजी सुळकुड पाणी योजनेबाबत व्यापक बैठकीचे आयोजन- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महानिर्मितीचे बोर्गी(जिल्हा-सांगली) २ मेगावाट, दरीकोन्नूर ६.१६ मेगावाट (तालुका जत जिल्हा सांगली) येथील सौर ऊर्जा प्रकल्पाची कामे अंतिम टप्प्यात असून लवकरच कार्यान्वित होणार

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First solar power project under the chief ministers solar agriculture vahini scheme has been commissioned in kolhapur mrj
Show comments