कोल्हापूर : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी अहमदनगर येथून आलेल्या एकच कुटुंबातील पाच जण तोल जाऊन कृष्णा नदीत बुडू लागले. नदीपत्रात गस्त घालणाऱ्या वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी जीव धोक्यात घालून या सर्वांना वाचवून जीवदान दिले. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहमदनगर येथून पानेरी कुटुंब नृसिंहवाडी येथे आले होते. दत्त दर्शनाअगोदर नदीपात्रात स्नान करण्यासाठी ते कुटुंब गेले, नदीपात्रातील पायऱ्यावर शेवाळ असल्याने कुटुंबातील सदस्यांचा पाय घसरला. एकमेकांना बाहेर काढण्यासाठी कुटुंबातील पाच व्यक्ती नदीपात्रात पडल्याने ते सर्वजण बुडू लागले.

हेही वाचा – मतदान पूर्ण होईपर्यंत थांबायचं नाही गड्या; अमित शहा यांचा कोल्हापुरातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सल्ला

हेही वाचा – नरेंद्र मोदी यांच्या इतकी पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा कधीही झाली नाही – शरद पवार

या ठिकाणी वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान गस्त घालत होते. ही घटना लक्षात येताच त्यांनी तातडीने जीव धोक्यात घालून नदीपात्रात उडी मारून पानेरी कुटुंबातील सर्व सदस्यांचा जीव वाचवला. गेल्या पंधरा दिवसात नृसिंहवाडी येथे बुडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दत्त देवस्थानने वरवरचे काम न करता भाविकांच्या सुरक्षेसाठी सतर्क राहून उपाययोजना राबवण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five members of the same family drowned in the river at nrusinhawadi wazir rescue personnel saved lives ssb