नृसिंहवाडीतील आठही घाट पाण्याखाली

गेले वर्षभर प्रशासन तयारीला लागलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी  येथील कन्यागत महापर्वकाळ सोहळ्याला प्रारंभ होत असताना अडचणीच्या मालिकेला तोंड द्यावे लागणार आहे. संथ वाहणारी कृष्णामाई दुथडी भरून वाहू लागली असल्याने पवित्र स्नानाची संधी असलेले सर्व आठ घाट पाण्याखाली गेले असल्याने स्नान करणे जिकिरीचे बनले आहे. दत्त मंदिर पाण्याखाली पूर्णत बुडालेले असल्याने श्रींचे दर्शन होण्याची शक्यता नाही. ना नीट स्नान ना देव दर्शन अशी दुहेरी अडचण असल्याने सोहळ्याच्या सलामीला अपेक्षेप्रमाणे भाविक आलेले नाहीत. १३ महिने सोहळा चालणार असल्याने आताच घाई कशाला असा विचार भाविकांमध्ये दिसतो. पाण्याची पातळी कमी करण्याकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने आणि नियोजनात गोंधळ असल्याने सोहळ्यावर पाणी फिरताना दिसत आहे.

या वर्षी सोहळ्याच्या पहिल्या पर्वणीला १० लाख भाविक येणार असल्याचा दावा प्रशासन करायचे. पण सोहळ्याच्या पूर्वसंध्येचे रंग पाहता या दाव्याचे रंग फिके झाल्याचे पाहायला मिळाले. याचे कारण काहीसे नसíगक आहे तर काहीसे नियोजनातील उणिवांचे. या वर्षी कृष्णाकाठी दोनदा सलग आठवडाभर जोरदार पाऊस झाला. आठवडय़ापूर्वी झालेल्या पावसाने नदीच्या पाणी पातळीत झालेली वाढ कायम आहे.

दत्त मंदिर आणि आठ घाट पाण्याखाली गेले आहेत. सोहळ्यात आठ घाटातील स्नानाला महव आहे, पण ते पाण्याखाली असल्याने अंदाज नसलेल्या जागी स्नानास जाणे अभ्यागतांना धोक्यास निमंत्रण देणारे आहे. खेरीज, श्री दत्त महाराजांचे दर्शनही होणार नाही. या दोन अडचणी भाविकांना कर्णोपकर्णी तरी झाल्या आहेत व त्याची समाज माध्यमात चर्चा होऊन त्याची वार्ता समजली आहे. यामुळे लाखाचे आकडे दृष्टिपथात नाहीत.  सोहळ्यांतर्गत स्नान व श्री दर्शन या बाबीचे महत्त्व विदित असताना प्रशासनाने नदीच्या पाणी पातळीचे नियोजन करणे गरजेचे होते, असा भाविकांचा सूर आहे. कोयना, चांदोली धरणातून होणाऱ्या पाण्याच्या  निसर्गाचे प्रमाण कमी करायला हवे होते. तद्वत, अलमट्टी धरणातील विसर्ग वाढवायला हवा होता. जेणेकरून वाडीतील नदीची पाणीपातळी कमी झाली असती. किमान स्नान करता येतील इतपत पहाटेच्या वेळी घाट निर्धोक राहिले असते. या बाबीकडे दुर्लक्ष झाल्याची खंत भाविक बोलून दाखवतात. तर, तालुक्यातील ग्रामस्थांनी पाण्याला उतार मिळून घाट व मंदिर स्पष्टपणे दिसू लागल्यावर पर्वणी सोडण्यास या, असा निरोपच धाडला आहे.

Story img Loader