कोल्हापूर जिल्ह्य़ामध्ये करोना विषाणूचे रुग्ण आढळून आल्यानंतर मदतीचा ओघ मोठय़ा प्रमाणात सुरू झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने आज दोन कोटी रुपयांची मदत जाहीर केली. तर, इचलकरंजी येथील ‘फाय फाउंडेशन’ने एक कोटी रुपये पंतप्रधान सहायता निधीस देण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोना संकटावर मात करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने २ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला असल्याचे अध्यक्ष महेश जाधव यांनी शुक्रवारी सांगितले. मुख्यमंत्री सहायता निधीस दीड कोटी रुपये देण्यात येणार आहेत, तर ५० लाख रुपये कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले जाणार आहेत. यातील २५  लाख रुपये ग्रामीण आरोग्य व नागरी आरोग्य व्यवस्थित राहण्याकरता खर्च करावेत तर २५ लाख रुपये जिल्हा रुग्णालयातील (सीपीआर) सुविधांसाठी खर्च करावेत, अशी अपेक्षा सचिव विजय पवार यांनी व्यक्त केली.

दरम्यान इचलकरंजी येथील ‘फाय फाउंडेशन’ने पंतप्रधान साहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, करोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पाटील यांच्याकडे डॉक्टरांसाठी १०० संरक्षणात्मक गणवेश (प्रोटेक्टेड ड्रेस) दिले जाणार आहेत,असे फायचे प्रमुख पंडितराव कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी आमोद कुलकर्णी व विश्वस्त डॉ. एस. पी. मर्दा यांनी सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flow of financial help in kolhapur to combat the corona abn