अन्नप्रक्रिया उद्योगावर कोल्हापुरात परिषद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शेती, शेतकरी, उद्योजक व ग्राहक अशा सर्वाना लाभदायक ठरणाऱ्या अन्न प्रक्रिया उद्योगाची वाढ अधिक प्रमाणात होण्याची गरज आहे. या उद्योगात मूल्यवíधततेचा अधिक फायदा मिळणार असल्याने या क्षेत्राकडे अधिक प्रमाणात वळले पाहिजे. या उद्योगाच्या विस्तारासाठी येणाऱ्या अडचणींबाबत आपण केंद्र शासनाशी संपर्क साधून त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

सन फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यांच्यावतीने येथे अन्नप्रक्रिया उद्योगातील प्रचलित प्रवाह या विषयावर उद्योजकांची गोलमेज परिषद भरविण्यात आली होती. या वेळी मार्गदर्शन करताना खासदार संभाजीराजे बोलत होते.

सीआयआयचे दक्षिण महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष व घाटगे-पाटील ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष मोहन घाटगे यांनी अन्नप्रक्रिया व्यवसायातील संधीबाबत विवेचन केले. ते म्हणाले,की आत्तापर्यंत सीआयआयने मॅन्युफॅक्चरींग क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले होते. आता अन्नप्रक्रिया उद्योगाकडे लक्ष पुरविले असून यामधील संधीचा लाभ शेतकरी, उद्योजक व ग्राहकांना मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने शेतीमालाला चांगला भाव मिळण्यासाठी या क्षेत्राची वाढ झाली पाहिजे. गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये अन्नप्रक्रिया उद्योगाची निर्यात वाढत चालली आहे. विदेशी लोकांना तसेच तेथे राहणाऱ्या भारतीयांना अस्सल भारतीय खाद्य हवे असून त्यांना पुरवठा करणाऱ्या उद्योगाचा विस्तार होत चालला आहे. ३० हजार कोटी रुपयांची निर्यात या क्षेत्राने केली असून पश्चिम महाराष्ट्रात शेती, दुग्ध, फळबागा या क्षेत्रात उद्योजकांनी उतरावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

या वेळी केन अ‍ॅग्रीटेक हुबळीचे कार्यकारी संचालक विवेक नायक, गद्रे मरीन एक्स्पोर्ट प्रा. लि.चे कार्यकारी संचालक अर्जुन गद्रे, सेंटर ऑफ प्रोसेस्ड फूड बेंगलोरचे मुख्य कार्यकारी अधिकारी केतन हंचाटे, आयआयटी मुंबईचे प्रा. नरेंद्र शहा, घोडावत कंझ्युमर्स प्रोडक्टचे डेव्हिड करंबळेकर, अर्जुन गद्रे, सातारा फुडपार्कचे उपाध्यक्ष विजयकुमार चोले, शिवाजी विद्यापीठाच्या अन्न प्रक्रिया विभागाचे मुख्य प्रा. ए. के. साहू, गोकुळ दुध संघाचे एस. पी. समुद्रे, सीडबीचे व्यवस्थापक रिवद्र कुमार, वारणा दूध संघाचे एच. एन. देसाई, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मोहन केंबलकर, मनोहर शर्मा, सुनील काळे, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी नंदू नाईक, भगवान चंदानी, बँक ऑफ इंडियाचे एम. जी. कुलकर्णी, जिल्हा उद्योग केंद्राचे श्रीपाद दामले, कोल्हापूर हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर यांनी भाग घेतला. अजय सप्रे यांनी आभार मानले.