कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जायचे की अजितदादांसोबत या द्विधा मनस्थितीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष, माजी आमदार,बिद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी आपला निर्णय अखेर शुक्रवारी जाहीर केला. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे घोषणा येथे एका बैठकीत केली. त्यांच्या या निर्णयाचे कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुभंग झाल्यानंतर जिल्ह्यातील कार्यकर्ते शरदनिष्ठ व अजितदादा अशा दोन गटात विभागले गेले. पहिल्याच आठवड्यात बहुतांशी स्थानिक नेते, कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मात्र राधानगरी -भुदरगडचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी मात्र आपला निर्णय जाहीर नव्हता.

हेही वाचा >>>लाच प्रकरणी कोल्हापुरात वनपाल,वनरक्षक रंगेहात पकडले

हसन – किसन मैत्री कायम

आता राष्ट्रवादीची कोल्हापुरात सभा होत असताना पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्चीया सोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला.पाटील यांचे शरद पवार यांच्याशी राज्यपातळीवर तर स्थानिक पातळीवर हसन मुश्रीफ यांच्याशी निकटचे संबंध होते.दुसरीकडे, जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफ- पाटील यांची मैत्री हसन – किसन या नावाने ओळखली जाते. मुश्रीफ यांनी पहिल्या दिवसापासून अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बिद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला होता.

हेही वाचा >>>पाण्याचा तिढा वाढला; इचलकरंजी नंतर कुरुंदवाडलाही दुधगंगेतून पाणी देण्याची मागणी

कारखाना कि विधानसभा ?

मात्र, कारखान्याची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणाकडे जायचे याचा गोंधळ होता. मतदार संघाच्या राजकारणात शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर हे त्यांचे प्रतिस्पर्धी असल्याने अजितदादा गटात गेले तर विधानसभेची निवडणूक लढवण्याबाबत त्यांची अडचण झाली होती. तर मुश्रीफ यांच्याशिवाय बिद्री कारखान्याची निवडणूक पार पाडणे अडचणीचे होते. या गोंधळाच्या स्थितीत अखेर त्यांनी अजित पवार यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे.

Story img Loader