कोल्हापूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष ऍड.गुलाबराव घोरपडे यांचे रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.ते ७८ वर्षांचे होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे  २०१२ पर्यंत  ऍड. गुलाबराव घोरपडे अध्यक्ष पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात देवस्थान समितीने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले होते. राज्यात महाविकास आघाडीचे शासन आल्यानंतर पुन्हा एकदा अध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काँग्रेस पक्षाचे त्यांनी दीर्घकाळ काम केले. काँग्रेसच्या राज्यस्तरावरील तसेच राष्ट्रीय स्तरावरील अनेक नेत्यांशी त्यांचे संबंध होते. विशेषता माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे विश्वासू सहकारी होते. अलीकडे ते जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्यासमवेत काम करत होते.  गेल्या महिन्यात राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करून त्यांचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे त्याविरूद्ध कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा, पापाची तिकटी येथे झालेल्या सत्याग्रह आंदोलनात ते सहभागी  झाले होते.