कोल्हापूर सांगली रस्त्यावर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगलीच्या दिशेने निघालेल्या झायलो गाडीचे टायर फुटल्याने ती जयसिंगपूरजवळ समोरून येणाऱया टॅंकरवर जाऊन आदळली. यामुळे गाडीतील चौघांचा जागीच मृत्यू झाला. शिवराज पाटील (३०), कपिल पाटील (२८), प्रवीण मोहिते (३५), आनंदकुमार खोत (३५, सर्व रा. कर्नाला) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर संतोष दैत्य आणि सचिन जामखंडेकर हे या अपघातात जखमी झाले आहेत. रात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. धडक इतकी तीव्र होती की त्यामध्ये झायलोचा चेंदामेंदा झाला आहे.
या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Story img Loader