लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोल्हापूर: येथील चार खेळाडूंची प्रो-कबड्डीच्या आगामी दहाव्या सिझनसाठी विविध संघातून निवड झाली आहे. कबड्डी राव’ज अकडमीमध्ये प्रशिक्षण घेणारे तेजस मारुती पाटील, ओंकार नारायण पाटील, आदित्य शंकर पोवार व दादासो शिवाजी पूजारी अशी त्यांची नावे आहेत. जिल्ह्याच्या कबड्डी परंपरेत भर पडली असल्याचे कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. संभाजी पाटील यांनी सोमवारी सांगितले.

निवडले गेलेले चौघेजण राव’ज अकडमीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डा.रमेश भेंडिगिरी, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू उमा भोसले-भेंडिगिरी, प्रा.आण्णासाहेब गावडे यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत.

२० लाखाची बोली

इचलकरंजीच्या जयहिंद मंडळाचा आदित्य शंकर पोवार याची बंगळूरु बुल्स संघात, शिंगणापूरच्या जिल्हा परिषद शाळेचा ओंकार नारायण पाटील याची तेलगू टायटन संघात तर शिरोलीच्या जय शिवराय मंडळाचा दादासाहेब शिवाजी पूजारी याची पुणेरी फलटण संघात प्रत्येकी २० लाख रकमेसाठी करारबद्ध झाले आहेत. गतवर्षापासून खेळणा-या तेजस मारुती पाटील (सडोली) याचा सप्टेंबरमधील ऑक्शननंतर संघ निश्चित होणार आहे.