१५ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींना देण्याबाबत एक वर्षांची शिफारस नुकतीच प्राप्त झाली आहे, अशी माहिती केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शुक्रवारी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिली. उर्वरित चार वर्षांबद्दल धोरण ठरलेले नाही, असेही तोमर म्हणाले.
पंचायतराज दिनानिमित्त केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने देशातील ग्रामविकास मंत्र्यांशी या संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंत्री तोमर यांच्याशी मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
केंद्र सरकारने अलीकडेच सुरु केलेली ‘स्वामित्व’ ही ग्रामीण भागातील मालमत्ता मालकी हक्काची योजना ही मूळ महाराष्ट्र सरकारची योजना असल्याकडे लक्ष वेधून मंत्री मुश्रीफ म्हणाले,या योजनेवर महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत ४० कोटी रुपये खर्च केले असून प्रकल्पाचे पुढे काय होणार, अशी विचारणा केली असता तोमर यांनी योजना अथकपणे चालणार असल्याचे स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या रणरागिणींचे कौतुक
करोनाविरुद्ध लढण्यासाठी बचत गटांच्या मार्फत केलेल्या कामांची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली. महिला बचत गटांच्या माध्यमातून आतापर्यंत ३५ लाख मास्क निर्मितीतून चार कोटींहून अधिक उलाढाल केली आहे. सॅनिटायझर निर्मिती, भाजीपाला व दूध याच्या वितरणामध्येही महिला बचत गट आघाडीवर असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. हा संदर्भ घेत केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी मंत्री म्हणून मुश्रीफ यांच्यासह महाराष्ट्राच्या बचत गटांमध्ये काम करणाऱ्या रणरागिणींचे कौतुक केले.