येथील गणेशोत्सव आणि बकरीईद कार्यक्रम िहदूमुस्लीम बांधव एकत्र साजरा करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुस्लीम बांधवांनी रात्री दहा ते पहाटे सहा या वेळेत मशिदीवर ध्वनिक्षेपक न लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
पोलीस उपअधीक्षक दीपक हुंबर यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष भूषण गायकवाड, पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर िहदू मुस्लीम बांधवांची पोलीस स्थानकात बठक झाली.या वेळी नगरसेवक सचिन फरांदे, महेंद्र धनवे, माजी नगरसेवक मन्नान जमादार आदी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाने उत्सवासाठी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी पोलीस काटेकोरपणे करणार असल्याचे दीपक हुंबरे यांनी सांगितले.गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अथवा जातीय तेढ निर्माण होणार नाही याची सर्वानी दक्षता घ्यावी असे आवाहन केले.िहदू-मुस्लिमांनी गणेशोत्सव आणि बकरीईदचा सण एकत्र येवून साजरा करावा असे आवाहन केले.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहा ते पहाटे सहा या वेळेत स्पीकर लावले जावू नयेत यासाठी विशेष खबरदारी घ्यायची आहे.या आदेशाचे तंतोतंत पालन मुस्लीम बांधवांनी करायचे आहे.बकरी ईदला गोहत्या करु नये, तर गणेशोत्सव डॉल्बीमुक्त साजरा करायचा आहे.कोणाकडूनही ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे दीपक हुंबरे यांनी सांगितले.पोलिसांच्या आदेशा प्रमाणे गणेशमंडळांनी डॉल्बीमुक्तीचा निर्णय घेतला तसा मुस्लीम बांधवांनी आदेशाप्रमाणे स्पिकर न लावण्याचा निर्णय घ्यावा,असे नगराध्यक्ष भूषण गायकवाड यांनी सांगितले. या वेळी माजी नगरसेवक मन्नान जमादार म्हणाले, की बकरीईदच्या दिवशी बकऱ्याशिवाय दुसऱ्या प्राण्याची कुर्बानी दिली जाणार नाही. याशिवाय न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे शहर प्रमुख युसूफ बागवान, मोहज्जम इनामदार, इक्बाल बागवान, मुस्तफा शेख, निसार नालबंद इम्तियाज, मुल्ला फारुक मोमीन, सनाउल्ला शेख, साजिद तांबोळी आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा