राजकीय नेते मंडळींच्या दौऱ्यावर भाजपचे पक्ष चिन्ह असलेले गमछा विद्यार्थिनींच्या गळ्यात अडकवल्याचे प्रकार उघडकीस आला आहे. अशा स्थितीतील विद्यार्थिनींचा केंद्रीय मंत्री, खासदारांनी लेझीम नृत्य केल्याचा प्रकारही समाज माध्यमातून अग्रेषित झाला असून त्यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा >>> कोल्हापूर : वाघाची कातडी पांघरलेले गद्दार निघून गेलेत; संजय राऊत यांचा प्रहार

second title fight of Maharashtra Kesari will also be held in Ahilyanagar
‘महाराष्ट्र केसरी’ची दुसरी किताबी लढतही अहिल्यानगरमध्येच रंगणार!
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
delhi assembly election 2025
लालकिल्ला : भाजपसाठी वर्ग ठरला ‘धर्म’!
BJP target for Bihar Chief Minister post after victory in Delhi assembly elections
दिल्लीच्या विजयानंतर भाजपचे पुढील लक्ष्य बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर
Ganpat Gaikwad wrote letter to Kalyan Dombivli Municipal Commissioner with jail approval
गणपत गायकवाड यांचे तुरुंगातून विकास कामांसाठी कडोंमपा आयुक्तांना पत्र
अग्रलेख : आहे बहुमत म्हणून…?
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
Chhatrapati sambhajinagar loksatta news
सिल्लोड भाजप शहराध्यक्षांसह तिघांविरुद्धचा गुन्हा रद्द, माजीमंत्री अब्दुल सत्तारांविरुद्धचे वक्तव्य प्रकरण

केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी बसर्गे (ता. चंदगड) येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांच्यासमवेत राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हेही होते.

त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होती. स्वागतासाठी उपस्थित विद्यार्थिनींच्या गळ्यात भाजपचे पक्ष चिन्ह असलेले गमछे घालून उभे करण्यात आले होते. मंत्री शिंदे, खासदार महाडिक यांचे आगमन झाल्यावर विद्यार्थिनींनी लेझीम नृत्य सुरू केले. यावेळी शिंदे, महाडिक यांनाही लेझीम नृत्य करण्याचा मोह आवरला नाही. तेही विद्यार्थिनी समवेत लेझीम खेळताना लेझीम खेळू लागले. या सर्व प्रकारचे चित्रीकरण करणारा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये अग्रेषित झाला आहे.

हेही वाचा >>> कोल्हापूर : सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या पाठीत काठी – राजू शेट्टी

त्यावरून उलट सुलट प्रश्न उपस्थित केले जात आहे. आजचे विद्यार्थी देशाचे उद्याचे भविष्य असतात. परंतु भाजपा शैक्षणिक संस्थाना राजकीय अड्डा बनवत आहे. पक्षाचा पट्टा गळ्यात अडकवून देशाच्या भविष्याचा हा प्रवास नेमका कुठल्या दिशेने चालू आहे? संयोजक एवं शाळेच्या मुख्याध्यापकांवर जिल्हा प्रशासनामार्फत कार्यवाही होईल का?,असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Story img Loader