गोकुळ दूध संघाने शुक्रवारी म्हैस व गाय दूध दर संघात प्रतिलिटर दोन रुपयाची वाढ केली आहे. दूध दरामध्ये आणखी एकदा दरवाढ करून गोकुळने मुंबई, पुणे,कोल्हापूर येथील ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लावली आहे. राज्यातील सर्वात मोठ्या सहकारी गोकुळ दूध संघाने गेल्या काही दिवसांमध्ये दूध विक्री दरात वाढ करण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या महिन्यामध्ये गाय दूध विक्रीमध्ये दोन रुपयाची वाढ केली होती. आता पुन्हा एकदा गोकुळने ग्राहकांचा खिसा कापायला सुरुवात केली आहे.

हेही वाचा >>> कोल्हापुरातील नरके घराण्यातच फाटाफूट

म्हैस दूध दर प्रति लिटर ६९ रुपये होता. त्यामध्ये आज आणखी दोन रुपयाची वाढ करण्यात आली आहे. गाय दूध विक्री दर ५४ रुपये वरून आता 56 रुपये इतका झाला आहे. ग्राहकांना रोज २८ लाखाचा फटका गोकुळचे म्हैस दूध विक्री प्रतिदिन १० लाख ४० हजार लिटर आहे. गाय दूध विक्री २ लाख ६० हजार इतकी आहे. यामुळे गोकुळच्या तिजोरीत दररोज २८ लाख रुपयांची भरभक्कम भर पडणार आहे. तर इतक्याच रकमेचा ग्राहकांना फटका बसणार आहे.

Story img Loader