कोल्हापूर : गोकुळ दूध संघात औषध खरेदीत घोटाळा झाल्याच्या एका पत्राने बुधवारी खळबळ उडाली. पशुसंवर्धन विभागात औषध खरेदी केल्यानंतर निम्न दर्जाची औषधे पुरवठा केला जात आहे. या प्रकरणात सहभागी असलेले पशुसंवर्धन विभागातील डॉ. प्रकाश साळुंखे यांच्या कारभाराची चौकशी करून निलंबित करण्यात यावी अशी मागणी केली आहे.गोकुळ दूध संघातील पशुसंवर्धन विभागातील औषधी खरेदी घोटाळा अशा विषयाचे हे पत्र आहे. हे पत्र निनावी असून ते कारखाना दूध संघाचे अध्यक्ष व संचालकांना तसेच माध्यमांना पाठवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

  या पत्रात म्हटले आहे की, गोकुळने औषध काहेरीची समिती नियुक्त केली असली तरी हे काम गेले अनेक वर्ष पशुसंवर्धन विभागातील डॉ. प्रकाश साळुंखे करतात. ते औषध  कंपन्यांची परस्पर बैठका घेऊन टक्केवारी ठरवून घेतात. ज्या कंपन्या औषधे पुरवठा करतात त्या सुरुवातीच्या बॅचेस औषधाची गुणवत्ता चांगली असते. त्यानंतर याच औषधांच्या इंजेक्शन मध्ये पाणी भरले जात असल्याने औषधाचा कोणताही गुणधर्म दिसून येत नाही. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या विषयी तक्रारी आहेत.

हेही वाचा >>>इचलकरंजीत अल्पवयीन मुलाचा खून; चौघेजण ताब्यात

विरोधक बोलणार ?

प्रत्येक औषध मेडिसिन स्टोअरला येण्यापूर्व त्याची गुणवत्ता तपासणी गरजेचे असताना तसे केले जात नाही. त्याचाच फायदा डॉ. साळुंखे घेत आहेत. अनेक कंपन्यांशी त्यांचे लागेबांधे असून त्यांना कोट्यावधी रुपयांचे कमिशन मिळत असते. हा भ्रष्ट अधिकारी कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर कोणकोणत्या औषध कंपनीच कंपनीची बैठक करत असतो, याची चौकशी करावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी या पत्रात केली आहे. या पत्रावर सर्व दूध उत्पादक सभासद कर्मचारी सुपरवायझर असा उल्लेख आहे.  याबाबत विरोधी गटाकडून एक दोन दिवसात केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हा तर खोडसाळपणा

 औषध खरेदी वेळी उच्च गुणवत्तेची औषधे कमिटीमध्ये सविस्तर चर्चा होऊन खरेदी केली जातात. तपासणी नंतर  पशुसंवर्धन विभागाच्या स्टोअर मध्ये ठेवली जातात. दूध उत्पादकांच्या मागणीनुसार जनावरांना उपचार केले जातात. निनावी पत्रावर नाव अथवा संदर्भ नाहीमजकुरामध्ये काहीही तथ्य नसून हे खोडसाळपणातून व व्यक्तिगत द्वेषातून तसेच गोकुळच्या बदनामीच्या हेतूने पाठविण्यात आले आहे, असा खुलासा गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी केला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gokul medicine purchase scam letter stirs up denial by the team amy
Show comments