राज्यात उद्यापासून गोकुळच्या दुधाचे दर वाढणार आहेत. उद्या १ ऑगस्टपासून हे नवे दर लागू होणार असून ग्राहकांना आता गोकुळचे गायीचे दूध घेण्यासाठी दोन रूपये जास्त मोजावे लागणार आहेत. सध्या ग्राहकांना गोकूळच्या एका लीटर दूधासाठी ३८ रूपये मोजावे लागतात. मात्र, आता हेच दर ४० रूपये इतके होणार आहेत. तर गोकुळचे टोन्ड दूध सध्या ४० रुपयांना विकले जाते. ते उद्यापासून ४२ रुपयांना विकले जाईल. याशिवाय, गोकुळ लाईफच्या दूधाचे दर ४२ रुपयांऐवजी ४४ रूपये इतके करण्यात आले आहेत. मुंबईतील ग्राहकांच्या खिशाला या निर्णयाचा फटका बसणार आहे. गोकुळची ही दरवाढ केवळ गायीच्या दुधासाठी आहे. अजूनपर्यंत म्हशीच्या दुधाच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापूर्वी राज्यातील शेतकरी संपाची तीव्रता वाढू लागल्याने त्याची धास्ती घेत राज्य सरकारने दूध दरात तीन रुपये वाढ करण्याचा निर्णय जूनच्या मध्यास घेतला होता. ही दरवाढ करण्यापूर्वी शासनाने दूध संस्थांची बैठक घेतली असता एकतर्फी दरवाढ लादू नये, अडचणीत असलेल्या संस्थांना ती परवडणारी नाही, असा सूर संस्थाचालकांनी लावला होता. त्यानंतर ‘गोकुळ’ दूध संघाने दूध दरवाढ करणार असल्याचे स्पष्ट केले असून पाठोपाठ अन्य खासगी व सहकारी दूध संघही दरवाढीचा हाच मार्ग अनुसरणार असल्याचे संकेत मिळाले होते. दरवाढीचा बोजा दूध संघानी आपल्या खांद्यावर न घेता तो ग्राहकांच्या डोक्यावर लादण्याची खेळी केली असल्याने ग्राहकांना वर्षांकाठी सातशे कोटी रुपये ज्यादाचे मोजावे लागणार आहेत .