लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीसाठी सोन्याचा मुलामा असलेली प्रभावळ अर्पण भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांच्या हस्ते देवस्थान समितीकडं सुपूर्द करण्यात आली. शारदीय नवरात्रोत्सवापासून ही प्रभावळ वापरात येणार आहे.

namdev shastri dhananjay munde
भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांचा कर्जतमध्ये निषेध
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Gajendra singh shekhawat
शिवनेरी अंबरखाना संग्रहालयासह वारसा संवर्धनासाठी निधी, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांचे आश्वासन
Loksatta kutuhal Stone of Ghrishneshwar temple
कुतूहल: घृष्णेश्वर मंदिराचा पाषाण
पांढरे डाग असणाऱ्यांसाठी वधुवर परिचय मेळावा नागपुरात
Shivendra Singh Raje, Guardian Minister ,
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या स्वागताला ‘उदयनराजे मित्र समूह’
MLA Jorgewar organized BJP workers meeting and guardian minister felicitation program here.
पालकमंत्र्यांच्या सत्कारासाठी सभागृह देण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार; मनाई असतानाही आमदार किशोर जोरगेवार यांनी…
Chief Minister s Relief Fund marathi news
आता प्रत्येक जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष’

खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या वतीने यापूर्वीच देवीला सुवर्ण पालखी अर्पण करण्यात आली आहे. त्यानंतर सुवर्ण प्रभावळ घडवण्याचा संकल्प पूर्ण झाला आहे. ८० वर्षापूर्वीच्या प्रभावळीवर ट्रस्टच्यावतीने सोन्याचा मुलामा देण्यात आला. ४५ तोळे सोने वापरण्यात आले असून त्याची किंमत ३५ लाख रुपये आहे. गणेश चव्हाण आणि कारागिरांनी हे काम केले आहे.

आणखी वाचा-राज्यातील सूतगिरण्या बंद पडण्याच्या मार्गावर!

देवस्थान समितीच्यावतीने सचिव शिवराज नाईकवाडे यांनी या प्रभावळीचा स्वीकार केला. नवरात्रोत्सवात देवीसाठी ही सेवा करण्याचे भाग्य मिळाले, अशी प्रतिक्रिया अरूंधती महाडिक यांनी व्यक्त केली. गोरखनाथ चिंचवडे, अजित जाधव, नारायण बुधले, वसंत पंदरकर यांच्यासह काही देणगीदारांनी या सुवर्ण प्रभावळीसाठी सोने दिले आहे. त्यांचाही सत्कार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. महेंद्र इनामदार, जितेंद्र पाटील, अवनी सेठ, रामाराव, महादेव दिंडे उपस्थित होते.

Story img Loader