शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याची तारीख केंद्र व राज्य सरकारने १० ऑगस्टपर्यंत वाढवली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिली.  शेट्टी यांनी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

केंद्र सरकारकडून पीक विम्याबाबत धोरण जाहीर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी वेळेत न झाल्याने शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी मिळालेला होता. बँकांमध्ये पीक विम्याची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी झाल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले होते. अनेक राष्ट्रीयीकृत बँकांकडून कृषी विभागाकडून याबाबतची वेळेत माहिती न दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा केलेला नव्हता.  याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेट्टी यांच्या मागणीनुसार पीक विम्याच्या मुदतवाढीबाबतीतला विषय गांभीर्याने घेऊन प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्याकडे केली होती. त्यानुसार केंद्र व राज्य सरकारने १० ऑगस्टपर्यंत पीक विम्याची मुदतवाढीची घोषणा राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधानसभेत केली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.