कोल्हापूर: सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा या संस्थेचे “छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा” असे नामाधिकरण करण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी दिली.
सातारा येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ५०० रुग्णखाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. संस्थेच्या नामाधिकरणाचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला असून त्यानुषगांने आवश्यक ती कार्यवाही आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई करीत असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले .