वेळ रात्री साडेनऊची कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम कडून एक रुग्णवाहिका सुसाट निघालेली. तिने आधीच दोन दुचाकींना उडवले होते. पुढे आणखी अपघात होण्याची चिन्हे दिसू लागली होती. अशावेळी सावध होऊन काही सजग नागरिकांनी रुग्णवाहिका अडवली. आणि तिचा दरवाजा उघडून पाहतात तर काय आश्चर्य! त्यामध्ये चक्क महाविद्यालयीन तरुणी होत्या. त्या लपून-छपून गरबा खेळायला निघाल्या होत्या. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयाच्या कारभाराचा भांडाफोड झाला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री कोल्हापूरचेच असताना कोल्हापुरात हा प्रकार घडल्याने त्याची खमंगपणे चर्चा सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कोल्हापूर : वकील रणजीतसिंह घाटगे याची सनद रद्द, १४ लाख दंड देण्याचाही हुकूम

त्याचे असे झाले, हॉकी स्टेडियमसमोरून गोखले महाविद्यालयाच्या कडे येणारी रुग्णवाहिका सायरन वाजवत भरधाव वेगाने निघाली होती. या रुग्णवाहिकेने दोन वाहनांना ओव्हरटेक करून दोन दुचाकींनाही धडकली.त्यावेळी नागरिकांनी पाठलाग केला तेव्हा चालकाशेजारी दोन युवती बसल्याच लक्षात आले.

हेही वाचा >>> कोल्हापूर : राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेला दमदार प्रतिसाद; हजारो शेतकऱ्यांचा उत्साही सहभाग

नॉर्थस्टार हॉस्पिटलच्या समोर रुग्णवाहिका थांबवली आणि चालकाला रुग्णवाहिकेचे मागचे दार उघडायला सांगतिले. सुरुवातीला चालकाने नकार दिला. मात्र, आजूबाजूला जमलेला जमाव बघून त्याने दरवाजा उघडला, तेव्हा गरबा खेळण्यासाठी रुग्णवाहिकेत दाटीवाटीने तरुणी बसल्याचे लक्षात आले. नागरिकांनी याबाबत माहिती विचारल्यानंतर या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असून, त्या गरबा खेळण्यासाठी निघाल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर काही जणांनी जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क केला.जुना राजवाडा पोलिसांचे गस्ती पथकाने तत्काळ तेथे येत चालकाच्या परवान्याचे छायाचित्र काढून पुन्हा असा प्रकार न करण्याची ताकीद दिली. रुग्णवाहिकेचा वापर अशासाठी केल्याचं लक्षात आल्यानंतर नागरिकही यावर संताप व्यक्त करत आहेत.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government medical college students use hospital ambulance to reach garba venue zws