कोल्हापूर : जीएसटी भरला नसल्याने कारवाई होऊ नये याकरिता दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कर निरीक्षक मंगळवारी जाळ्यात सापडला. विशाल बाबु हापटे (वय ३५, रा. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. तक्रारदार यांच्या मित्राचा टायर्स विक्रीचा व्यवसाय आहे. त्या व्यवसायचा जीएसटी भरलेला नव्हता. त्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जावू नये यासाठी कर निरीक्षक हापटे यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजार रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम तक्रारदार यांच्याकडून घेताना हापटे हे रंगेहात पकडले गेले. आरोपी विरुद्ध शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच प्रकरणी कोल्हापुरात जीएसटी विभागाचा कर निरीक्षक जाळ्यात
आरोपी विरुद्ध शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 05-09-2023 at 19:51 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gst officer arrested while accepting bribe in kolhapur zws