कोल्हापूर : जीएसटी भरला नसल्याने कारवाई होऊ नये याकरिता दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कर निरीक्षक मंगळवारी जाळ्यात सापडला. विशाल बाबु हापटे (वय ३५, रा. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. तक्रारदार यांच्या मित्राचा टायर्स विक्रीचा व्यवसाय आहे. त्या व्यवसायचा जीएसटी भरलेला नव्हता. त्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जावू नये यासाठी कर निरीक्षक हापटे यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजार रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम तक्रारदार यांच्याकडून घेताना हापटे  हे रंगेहात पकडले गेले. आरोपी विरुद्ध शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा