कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या निर्णयाच्या अधिसूचनेची प्रत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सादर केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर, माजी पालकमंत्री सतेज पाटील, मुश्रीफ यांचे राजकीय स्पर्धक समरजित घाटगे यांनी या निर्णयावर टीकेचा सूर लावला आहे.

कागल येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला आहे, असे नमूद करून या अधिसूचनेची प्रत त्यांनी शक्तिपीठ महामार्गासाठी आंदोलन करणारे उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांच्याकडे सुपूर्त केली.

List of candidates for assembly elections in Kolhapur announced
कोल्हापुरात उमेदवार जाहीर करण्यात महायुतीची आघाडी
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक पोस्टमध्ये म्हणाले, “सुना है पुराने दोस्तों ने…”
mva seat sharing formula
मविआच्या फॉर्म्युल्यात १५ जागांचा हिशेबच नाही; या जागांचं नेमकं काय होणार? वडेट्टीवार म्हणतात…
nitin Gadkari controversial statement
गडकरींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपपुढे पेच, प्रचारात सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नात अडचणी
baba siddique shot dead
“माझा मुलगा पुण्यात भंगारचं काम करायचा, तो मुंबईला…”; बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या आरोपीच्या आईची प्रतिक्रिया!
salman khan life threat lawrence bishnoi gang
“जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर…”, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने आली धमकी; केली ‘ही’ मागणी!
sakshi malik on brij bhushan singh
Sakshi Malik: ‘भाजपा नेत्या बबिता फोगट यांनीच रचलं कुस्तीपटूंच्या आंदोलनाचं षडयंत्र’, साक्षी मलिकचा धक्कादायक दावा

हेही वाचा >>>शक्तिपीठ महामार्ग रद्द; हसन मुश्रीफ यांची घोषणा

शेतकऱ्यांचा जल्लोष

मुश्रीफ यांनी ही घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. या निर्णयावर मंत्री मुश्रीफ यांनी म्हणाले, की शक्तिपीठ महामार्गामुळे असंख्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार होते. याला शेतकऱ्यांनी विरोध करत आंदोलन केल्याने हा महामार्ग रद्द होऊन या लढ्याला यश आले आहे. या कामी मंत्रिमंडळात पाठपुरावा करू शकलो याचा विशेष आनंद आहे.

विरोधकांचे टीकास्त्र

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा इतका मोठा निर्णय १५ ऑक्टोबरला झाला असताना तो आठवडाभराने घोषित का केला, असा प्रश्न उपस्थित करून काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी अशा प्रकारे अशी अधिसूचना काढणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. फक्त कोल्हापूर वगळण्याचा निर्णय कसा होऊ शकतो? आचारसंहिता असताना निवडणुकीच्या तोंडावर शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, अशी टीका केली. शाहू उद्योगसमूहाचे प्रमुख समरजित घाटगे यांनी, आचारसंहितेत अशा प्रकारे अधिसूचनेद्वारे शक्तिपीठ महामार्ग रद्द होऊ शकत नाही. निवडणूक झाल्यानंतर हा निर्णय बदललाही जाऊ शकतो. शासनाने काही तरी केले आहे हे दाखवण्यासाठी निवडणूक काळात दिशाभूल चालवली आहे, अशी टीका केली.