गुजरात सरकारने साहित्यिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावून घेण्याचा एक नवा उद्योग सुरू केला आहे. लेखकाच्या लेखनाची त्यांच्या स्वातंत्र्याची गळचेपीच केली जाते. याप्रकारे गुजरात ही एक असहिष्णुतेची प्रयोगशाळाच होत आहे, असे खेदजनक उद्गार गुजरातचे भाषातज्ज्ञ गणेश देवी यांनी काढले.
समग्र विचारातून सर्वाचाच एक सम्यक दृष्टिकोन तयार व्हावा यासाठी ‘दक्षिणायन‘ अर्थातच दक्षिणेकडून असहिष्णुतेच्या विरोधातील विचाराच्या जागरासाठी गणेश देवी कोल्हापुरात आले होते. नवा देवल क्लब येथे ही चर्चा करण्यात आली.
यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  दाभोळकर,   पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येमुळे संतापलेल्या साहित्यिक जगताने आपल्याला मिळालेले साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करून आपली नाराजी व्यक्त केली. याबाबत बोलताना देवी पुढे म्हणाले, शासनाने घटनेच्या आधारावर जबाबदारी सांभाळली. पण शात्रशुद्ध दृष्टिकोन वाढवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा महत्त्वाचा धर्म आहे. अभिव्यक्तीची पूजा करणारे साहित्यिक वैचारिक मार्गावर टिकतात. याच्या रक्षणासाठी एकमेकाला समजून घेणे आवश्यक आहे. जे पुरस्कार परत केले आहेत. त्यागामे मूल्य आहे.
यावेळी कवी संजीव खांडेकर, चित्रपट दिग्दर्शक परेश नायक, कवी प्रवीण बांदेकर, कवी अनिल जोशी, मनिष जानी, वीरधवल परब, गोिवद काजरेकर, गणेश विसपुते आदी साहित्यिकांनी उपस्थिती लावली होती. या सर्व साहित्यिकांनी आपल्याला मिळालेले साहित्य पुरस्कार परत करून या तीन हत्यांबाबतची नाराजी व्यक्त केली. यावेळी नवोदित लेखकांसह अनेक साहित्यप्रेमी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा