कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ हे ईडीने शनिवारी केलेल्या कारवाईनंतर आज सोमवारी कागल येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत. ईडीची कारवाई सुरू झाल्यामुळे त्यांनी गावाकडे येण्याचे टाळले होते. ते गेले दोन दिवस नॉट रिचेबल होते . त्यामुळे त्यांची भूमिका समजत नव्हती. आज सकाळी अचानक ते कागल मध्ये दाखल झाले. ते आल्याचे समजतात त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांची गर्दी झाली. कार्यकर्त्यांच्या समवेतच ते घरामध्ये आले. त्यांनी कुटुंबीयांशी चर्चा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांना तपास यंत्रणांनी लक्ष्य केले आहे. गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा त्यांच्या कागल येथील निवासस्थानी ईडीने छापेमारी केली.

हेही वाचा… Maharashtra News Live : “उद्या व्हिडीओ मॉर्फ होण्याची वेळ तुमच्यावरही येऊ शकते, कारण…”, आमदार यामिनी जाधवांचा अधिवेशनात इशारा, वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

शनिवारी दिवसभर अधिकाऱ्यांचे पथक घरात कागदपत्रांची तपासणी करत होते. कुटुंबीयांकडेही त्यांनी चौकशी केली होती.तर ही चौकशी सुरू असताना हसन मुश्रीफ समर्थक मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी जमले होते. त्यांनी ईडी व भाजप विरोधात घोषणाबाजी केली होती. यामुळे तणाव निर्माण झाला होता . तर या कारवाई वेळी ‘ सतत चौकशी करण्यापेक्षा एकदा गोळ्या घाला’ अशी भावनात्मक प्रतिक्रिया त्यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी व्यक्त केले होती.

हेही वाचा… राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची नियुक्ती? जयंत पाटलांनी समोर आणली मोठी चूक; म्हणाले, “आता…”

कागलमधील निवासस्थानी परतलेल्या मुश्रीफ यांनी ईडीबाबत थेट भाष्य करणे टाळले आहे. दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना मुश्रीफ म्हणाले ” ईडीच्या पथकाने शनिवारी कागल येथील घरी तपासणी केली. दोन दिवस मी बाहेरगावी होतो. तेव्हा ईडीच्या कारवाई वेळी कुटुंबीयांची होणारी अवस्था टीव्हीवर पाहत होतो. त्यामुळे कुटुंबीयांना धीर देण्यासाठी कागल मध्ये आलो आहे. ईडीच्या पथकाने कारवाई पूर्ण झाल्यानंतर जाताना मला समन्स बजावले आहे. ईडी कार्यालयात मी उपस्थित राहण्यासाठी महिन्याची मुदत वाढ घेण्याबाबत वकिलांना कळविलेले आहे.त्याप्रमाणे ते कृती करतील. कारण सध्या राज्य विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे तसेच मी अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा मार्च अखेरचा व्यवहार पाहणे गरजेचे आहे”.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hasan mushrif arrived in kagal kolhapur demand of one month period of extension to attend ed office through advocate asj