अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागल येथील घरांवर छापे टाकले आहेत. दरम्यान, या छापेमारी मागे सत्ताधारी भाजपाचा हात असल्याचा आरोप मुश्रीफांचे लहान भाऊ अन्वर मुश्रीफ यांनी केला आहे. तसेच ईडीचे अधिकारी दाखल झाले, तेव्हा नेमकं काय घडलं? याबाबतही त्यांनी माहिती दिली. एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Hasan Mushrif ED Raid : कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीची छापेमारी; हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “विशिष्ट जातीच्या…”

काय म्हणाले अन्वर मुश्रीफ?

ईडीचे अधिकारी सकाळी ६ च्या दरम्यान आमच्या घरी दाखल झाले आणि अचानक आत घुसले. बाहेर स्टेनगन घेऊन पोलीस उभे केले. त्यांनी आत काय केलं माहिती नाही. कोणाला आत जाऊ देत नव्हते आणि आतमध्ये असलेल्या लोकांना बाहेरही येऊ देत नव्हते. त्यामुळे ही माणसं खरोखरच सरकारी आहेत की काय? असा प्रश्न आम्हाला पडला आहे. आम्ही विचारलं तर म्हणतात आम्ही तपास करतो आहे, अशी प्रतिक्रिया अन्वर मुश्रीफ यांनी दिली.

हेही वाचा – हसन मुश्रीफांच्या घरी ईडीकडून छापेमारी; राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले…

यावेळी हसन मुश्रीफांवरील आरोपांबाबत विचारलं असता, ते म्हणाले, आरोप झाले म्हणजे घोटाळा केला असं सिद्ध होत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच या कारवाईमागे सत्ताधारी भाजपाचा हात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hasan mushrif brother anwar mushrif allegation on bjp afer ed raid spb