कोल्हापूर: प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यासाठी १४४ आमदारांची पूर्तता हवी. ती झाली कि वानखेडे वा ब्रेबॉन कोणत्याही स्टेडियम मध्ये शपथ घेता येते, असा तिरकस टोमणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना येथे लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रशेखर बावनकुळे यांनी  वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे विधान केले होते त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुस्लिम कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा >>> कोल्हापुरात मनसेने इंग्रजी फलकांना काळे फासले

बीआरएसचा महाराष्ट्र धोका संपला

बीआरएसचे नेते के. चंद्रशेखरराव पंढरपूरला शेकडो, गाड्या हजारो कार्यकर्ते घेऊन आले तेव्हा आम्ही पण घाबरलो होतो. तेलंगणा हे स्वतंत्र राज्य होण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, आंदोलन वाखण्यासारखी होते. दहा वर्षाच्या कारभारात त्यांनी रयतू शेतकरी सारख्या योजना राबवून सातत्याने जाहिरातबाजी केली होती. अलीकडचे जमिनी वास्तव वेगळे होते हे निकालातून दिसले आहे. महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकीमध्ये बीआरएसचे काही चालेल असे वाटत नाही, अशी टिका त्यांनी केली.

हेही वाचा >>> आजरा कारखान्याच्या निवडणुकीसाठी हसन मुश्रीफ – सतेज पाटील या मित्रांमध्येच मुकाबला

भारत यात्रा अपयशी

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा सकारात्मक परिणाम झाला नाही हे चार राज्यांच्या हे विधानसभा निवडणूक निकालावरून सिद्ध झाले आहे, असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगीतले.

विधानसभा निकालांचा परिणाम महाराष्ट्रात होणार नाही असे विधान राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले आहे. त्यावर मुश्रीफ म्हणाले, कार्यकर्त्यांचे लोकांचे मनोधैर्य टिकवण्यासाठी अशी विधाने करावी लागतात.

ईव्हीएमची शुद्धता सिद्ध

ईव्हीएम बाबत यापूर्वी सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग यांच्याकडे तक्रारी झाल्या असता त्यांनी निर्वाळा दिला आहे. ईव्हीएम हे सिद्ध झालेले तंत्रज्ञान आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसचा विजय आणि एमआयएमच्या सर्व सात जागांवर विजयी उमेदवार विजयी होणे हा याचाच भाग आहे. त्यामुळे ईव्हीएम बाबत विरोधकांनी शंका उपस्थित करणे गैर आहे, असेही मुश्रीफ म्हणाले.