लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका, पंचायत समिती या निवडणुकांमध्ये सतेज पाटील सोबत आले तरच मैत्री राहील. ते राष्ट्रवादीत आले तर आम्ही एकत्र राहू, अशी ऑफर मंत्री हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना दिली. ते शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सतेज पाटील यांची राजकीय मैत्री आहे. या जोडगोळीने कोल्हापुरातील सर्वच निवडणुका हातात हात घालून लढूवन जिंकल्या आहेत. या जोडीने सन २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला जिल्ह्यातील एकही जागा जिंकू दिली नव्हती. जिल्हा परिषद महापालिका आणि गोकुळ मध्येही ही जोडी एकत्रच आहे.

हेही वाचा… कोल्हापूर: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस ५ वर्षे सक्तमजुरी; १० हजार रुपये दंडाची शिक्षा

आता मात्र हसन मुश्रीफ सत्ताधारी शिंदे -फडणवीस सरकार सोबत गेल्याने सतेज पाटील आणि मुश्रीफ यांची गट्टी कायम राहणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मुश्रीफ यांनी वरीलप्रमाणे विधान केले. ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयीचा आजही मनात आदर आहे. मात्र विकासाच्या मुद्द्यावर आमच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत, असेही मुश्रीफ यांनी एका प्रश्नाच्या वेळी सांगितले.

ईडीचा मुकाबला स्वबळावर यापूर्वीही राष्ट्रवादीने भाजपला सोबत केली होती. आता पुन्हा एकत्र आलो आहोत. ईडीचा मुकाबला आम्ही आमच्या ताकदीवर केला, असा दावाही मुश्रीफ यांनी केला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hasan mushrif commented saying if satej patil come together in kolhapur mnc and local self government elections then friendship will remain dvr
Show comments