कोल्हापूर : आमदार पी. एन. पाटील यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. त्यांना अधिकच्या उपचारासाठी मुंबईला हलविता येईल काय, याबद्दलची चौकशी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी केली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
कोल्हापुरातील आमदार पाटील उपचार घेत असलेल्या खाजगी दवाखान्याच्या प्रमुख डॉक्टरांशी मंत्री मुश्रीफ यांनी दूरध्वनीद्वारे ही चर्चा केली आहे. आमदार पाटील बाथरूममध्ये पडल्यानंतर त्यांच्यावर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेले चार दिवस पालकमंत्री मुश्रीफ हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत आहेत. आमदार पाटील यांची प्रकृती त्यांना कोल्हापुरातून एअर ॲम्बुलन्सद्वारे हलवून मुंबईला नेण्याजोगी साथ देणारी आहे काय, याबाबत मुश्रीफ यांनी विचारणा केली.
First published on: 22-05-2024 at 21:10 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hasan mushrif discussion with doctor over phone for further treatment of congress mla p n patil zws