कोल्हापूर : कोल्हापूर शहराला शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत योजनेतील प्रलंबित कामे सप्टेंबर अखेर पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना काळे यादीमध्ये टाका, असा आदेश शुक्रवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पालकमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महानगरपालिका उपायुक्त साधना पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शहर परिसरातील विविध विषयांचा आढावा घेऊन सूचना केल्या.
ते पुढे म्हणाले,अंबाबाई मंदिराभोवती ऐतिहासिक प्रकारचे आकर्षक व ध्वनीयुक्त विद्युत खांब बसविणे, पार्किंग व्यवस्था, शहरातील रस्ते, रंकाळा तलाव व पंचगंगा घाटावरील विद्युत रोषणाई, राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाचा विकास, भुयारी गटारीव्दारे सांडपाणी व्यवस्थापन, शहरात विद्युत खांब बसविणे यांसह शहर परिसरातील विविध विकास कामे जलद गतीने पूर्ण करा.
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, श्री अंबाबाई मंदिर परिसरातील विकास कामांची निविदा आठवड्याभरात काढा. शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यातून शहर परिसरात १६ रस्ते करण्यात येणार आहेत. यातील ५रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून उर्वरीत ११ रस्त्यांची कामे पावसाळा संपल्यानंतर तात्काळ हाती घेवून ती जलद गतीने पूर्ण करा. ही कामे करताना रस्त्यांचा दर्जा चांगला राहील याची दक्षता घ्या. केशवराव भोसले नाट्यगृह व राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदान जतन व संवर्धन, राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर थीम पार्कचा विकास, बोटॅनिकल गार्डन, गांधी मैदानात साचलेले पाण्याचे निर्गतीकरण, शहरातील विविध भागांत भुयारी गटारव्दारे सांडपाणी व्यवस्थापन अशी विविध विकास कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.
संभाव्य पूर परिस्थितीचा धोका टाळण्यासाठी चोख नियोजन करा. शिरोळ परिसरात गंभीर पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी अलमट्टी धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे.पूर परिस्थितीमुळे जीवित हानी होणार नाही, याची खबरदारी घ्या, त्यांनी सांगितले.
अमृत योजनेतील प्रलंबित कामे सप्टेंबर अखेर पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना काळे यादीमध्ये टाका , असे निर्देश त्यांनी दिले. थेट पाईपलाईनद्वारे शहरातील ए व बी वॉर्डामध्ये पाणीपुरवठा होत असून सी व डी वॉर्डामध्ये देखील पुर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होण्यासाठी उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करा. जिल्हा वार्षिक योजनेचा या आथिक वर्षातील निधी वेळेत खर्च होण्यासाठी या कामांना प्रशासकीय पातळीवर वेळेत मंजुरी द्या, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, जिल्हा व शहरातील विविध विकास कामे जलद गतीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करुन प्रशासनाच्या वतीने सूक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी शहरातील कामांच्या सद्यस्थितीची माहिती दिली.