कोल्हापूर : सुरुवातीच्या टप्प्यात मरगळलेला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता गती घेताना दिसत आहे. खासदार धैर्यशील माने यांनी सुरुवातीची मरगळ झटकून मतदारसंघात बांधणी करून प्रचारात पाय रोवले आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकला चलो रे चा नारा देत एकटा लढत असलो तरी सर्वांना पुरून उरणारा असल्याचे दाखवून देत आहेत. अखेरच्या टप्प्यात उमेदवारी जाहीर झाली तरी ठाकरे सेनेचे सत्यजित पाटील सरूडकर हे मशाल उजळवण्यात यशस्वी ठरले आहेत. वंचितची आस्तेकदम वाटचाल सुरू आहे. किसान नौजवान संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, जय शिवराय शेतकरी संघटनेचे संस्थापक शिवाजी माने यांचा प्रभाव कितपत राहणार याकडेही लक्ष असेल.

कोल्हापूर मतदारसंघाची निवडणूक वादाचे मोहोळ उठवत पुढे जात असताना तुलनेने शेजारच्या हातकणंगले मतदारसंघात प्रचाराचे वारे हळुवार वाहत राहिले. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता कोठे प्रचाराला गती येऊ लागली आहे. रखरखत्या उन्हाचा मारा असतानाही चारही उमेदवारांनी प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे.

controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Protesters demand that Vishalgad should be cleared of encroachments and dargah should be removed
विशाळगड अतिक्रमणमुक्त करत दर्गा हटवा; आंदोलकांची मागणी
Former MP Vinayak Raut criticizes Industries Minister Uday Samant in ratnagiri
“भाजप नेत्यांची गद्दारांना जागा दाखवायला सुरवात”, उद्योगमंत्री उदय सामंतांवर माजी खासदार विनायक राऊत यांची सडकून टीका
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : “एक दिवस तुमच्या सुसंस्कृतपणाचा पाढा…”, भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना थेट इशारा

हेही वाचा – केरळमधील ‘व्हायरल’ टीचर अम्मा आहे तरी कोण? काय आहे कम्युनिस्ट पक्षाची रणनीति?

मुख्यमंत्र्यांमुळे माने ‘धैर्यशील’

पहिल्या टप्प्यात खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागला होता. महायुतीअंतर्गत अनेकांनी उमेदवारीसाठी दावे केले होते. तथापि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक दिवस आड असे दोनदा कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा करून अपक्ष आमदारांची नाराजी दूर केली. शिवाय, मतदारसंघांतर्गत सहाही विधानसभा मतदारसंघात दमदार जोडण्या लावल्या असून त्यांची मतदारसंघात तळ ठोकून असलेली यंत्रणा प्रचाराच्या बारीक सारीक घटनांवर नजर ठेवून आहे. यामुळे सुरुवातीच्या काळात फिके भासणारे माने यांचे वातावरण दम पकडताना दिसत आहे. त्यांच्या प्रचारासाठी महायुतीची मोठी कुमक प्रचारात उतरली आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे, हा मुद्दा कार्यकर्त्यांच्या गळी चांगलाच उतरवला असल्याने भाजपचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. शिवाय, माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य अशी दुसऱ्या फळीतील फौज झाली असल्याने त्याचा माने यांना फायदा होईल असे दिसत आहे.

शेट्टींची बळीराजाला साद

माने यांच्या विरोधात आधीपासूनच आव्हान निर्माण केलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एकाकी वाटचाल सुरू ठेवली आहे. साखर कारखानदारांना शेतकऱ्यांना न्याय देणारा नेता नको असल्याने माझ्याविरुद्ध षडयंत्र चालवले असल्याचा मुद्दा ते प्रचारात प्रकर्षाने मांडत आहेत. मतदारसंघातील प्रश्नांची चांगली जाण असल्याने ते सोडवण्यासाठी अनुभवी नेतृत्वाची गरज ते अधोरेखित करीत आहेत. इचलकरंजीचा पाणी प्रश्न आणि वस्त्रोद्योग प्रश्न याचा फटका गेल्यावेळी शेट्टी यांना बसला होता. या दोन प्रश्नांसाठी आपण प्रभावीपणे काम केले असल्याचा मुद्दा ते ताकदीने मांडत असताना त्यांना नेहमीच साथ देत आलेल्या बळीराजाला साद घालत आहेत. ग्रामीण भागातील जेवणाचा डबा घेऊन भल्या सकाळी प्रचारासाठी बाहेर पडणारी शेतकऱ्यांच्या पोरांची पलटण हीच शेट्टी यांची खरी प्रचार यंत्रणा.

सरुडकरांमुळे समीकरणे बदलली

धैर्यशील माने व राजू शेट्टी यांच्यात पुन्हा एकदा सामना होणार असे वाटत होते. पण उद्धव ठाकरे यांनी पन्हाळा – शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या हाती मशाल देऊन रिंगणात उतरवल्याने मतदारसंघाची समीकरणे बदलली. आजी – माजी खासदारांच्या दृष्टीने सरुडकर यांची उमेदवारी म्हणजे काना मागून आली आणि तिखट झाली अशी काहीशी झाली आहे. महाविकासाकडे अंतर्गत या मतदारसंघात चांगले ऐक्य असल्याने उशिरा उमेदवारी जाहीर झाली तरी प्रचाराला लगेचच गती मिळाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यामध्ये लक्ष घातले आहे. खेरीज. ठाकरेसैनिक, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस यांच्यातील एकवाक्यता सरुडकर यांच्या पथ्यावर पडेल असे दिसत आहे. सरुडकर हे नवखे असल्याने त्यांच्याविरोधात प्रभावी मुद्दे अन्य उमेदवारांकडे नाहीत. हा एक त्यांना मिळालेला फायदा आहे. शिवाय, हातकणंगले – इचलकरंजी या लोकसभा मतदारसंघात आजवर हातकणंगले व शिरोळ या दोन तालुक्यांचीच मिरासदारी राहिली आहे. आताही माने, शेट्टी, वंचितचे डी. सी. पाटील हे तिघेही याच भागातील उमेदवार आहेत. पश्चिमकडील तालुके म्हणजे केवळ मते देणारा भाग म्हणून गेली ५० वर्षे पाहिले गेले. सरूडकर यांच्या रूपाने पहिल्यांदाच दमदार उमेदवारी पश्चिमेकडील डोंगराळ तालुक्याकडे गेली आहे. त्यामुळे तेथील स्थानिकांची अस्मिता या निमित्ताने पुढे आली असल्याने या भागात त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल असे वातावरण आहे.

हेही वाचा – काशी, मथुरा व अयोध्येचा मुद्दा काँग्रेसकडून जाणीवपूर्वक प्रलंबित; गिरीराज सिंह यांचा आरोप

तूर्त तरी प्रचारात अगदीच प्रभावी वादग्रस्त ठरणारे मुद्दे आलेले नाहीत. ऊस, एफआरपी यावरून नाही म्हटले तरी धैर्यशील माने- राजू शेट्टी यांच्यात जुनाच वाद रंगला आहे. इतर काही प्रश्नावरून ते एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. माने- शेट्टी हेच दोघांच्या टीकेचे पहिले लक्ष्य आहे. या वादापासून सरुडकर तसे काहीसे दूर आणि बऱ्याच अंशी दुय्यमस्थानी आहेत. तोच त्यांचा एकार्थी फायदा म्हणायचा. एव्हाना धैर्यशील माने, राजू शेट्टी, सत्यजित पाटील सरूडकर यांचा प्रचार हळूहळू वेग पकडू लागला आहे. मोठ्या सभा, बड्या नेत्यांची भाषणे यातून पुढील प्रचाराची दिशा कशी राहणार यावर बरेचसे अवलंबून आहे. गेल्यावेळी प्रारंभी कमजोर वाटणारे धैर्यशील माने यांनी उत्तरोत्तर वातावरण तापवून लाखाच्या मतांनी विजयी झाले होते. हा गतानुभवाचा धडा सर्वानाच शिकवून जाणारा आहे.

Story img Loader