कोल्हापूर : वातावरणातील तापमानाचा पारा वर सरकू लागल्याने नागरिक हैराण झाले असताना दुसरीकडे यामुळे पक्षांनाही फटका बसू लागला आहे. राधानगरी तालुक्यात उष्माघातामुळे हजाराहून अधिक कोंबड्या मृत्युमुखी पडल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. बेरोजगारीवर मात करण्यासाठी स्वयंरोजगार सुरू केला असताना कोंबड्या मरू लागल्याने व्यावसायिकांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

 उन्हाचा पारा चढू लागल्याने लोक हैराण झाले आहेत. पशुधनावरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. कुक्कुटपालन व्यवसायावर त्याचे विपरीत परिणाम दिसू लागले आहेत. आकनुर (ता. राधानगरी) येथे सेवानिवृत्त परिवहन कर्मचारी रंगराव पाटील व त्यांचा मुलगा अमर पाटील यांनी पाच वर्षांपूर्वी ५ हजार मांसल कोंबड्यांचा कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे.

rising mortality rates in young adults post-corona in america
करोनानंतर अमेरिकेत तरुणांच्या मृत्यूदरात वाढ
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
चिरनेरमधील बर्डफ्लूची साथ आटोक्यात आल्याचा पशुधन विभागाचा दावा, चिकन आणि अंडी शिजवून खाण्याचेही नागरिकांना आवाहन
Thousands of foreign birds arrived in Uran with flamingos moving due to Water bodies dried
उरणमध्ये फ्लेमिंगो नव्या पाणथळींच्या शोधात
Bhandara District, Sarpewada , Tiger, citizens crowd,
VIDEO : नरभक्षक वाघ दिसताच नागरिकांचा गोंधळ, सुरक्षा उपायांची…
Maharashtra tiger deaths
विश्लेषण : वर्षाच्या पहिल्या २२ दिवसांतच ११ वाघांचा मृत्यू… महाराष्ट्रात व्याघ्रसंरक्षणाचे गांभीर्य हरवले आहे का?
tigers death loksatta article
अन्वयार्थ : वाघांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?
Thane Municipal Corporation has issued a notice to shopkeepers in Kopri to keep chicken and mutton shops closed till February 5
कोपरीत ५ फेब्रुवारीपर्यंत चिकन, मटन विक्री दुकाने राहणार बंद; ठाणे महापालिकेने दिली दुकानदारांना नोटीस

पाच लाखाचा फटका

 आज दुपारी त्यातील हजाराहून अधिक कोंबड्या दगावल्या. कंत्राट कंपनी असलेल्या याराना पोल्ट्री कंपनीला याची माहिती दिल्यावर त्यांच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. उष्माघाताने कोंबड्या दगावल्या असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे पाटील कुटुंबियांना पाच लाख रुपये यांचे नुकसान सहन करावे लागले आहे. खड्डा जेसीबीने चर खोदून त्यामध्ये दगावलेल्या कोंबड्या दफन करण्यात आल्या

Story img Loader