कोल्हापूर  : जिल्ह्यात आज सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. वीज कोसळल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर एक वीटभट्टीवर काम करणारी महिला जखमी झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेले काही दिवस उन्हाचा कडाका जाणवत आहे. चैत्र पौर्णिमेची जोतीबा यात्रा संपल्यावर गुलाल धुवून काढण्यासाठी पाऊस हजेरी लावतो, अशी धारणा आहे. या परिसरात सायंकाळ पर्यंत पाऊस पडला नसला तरी तेथे आज दिवसभर काळ्या ढगांची छाया दाटली होती. जिल्ह्यात सर्वत्र सकाळपासून असेच वातावरण होते.

हेही वाचा >>> कोल्हापूर: पोक्सो कायद्यांतर्गत आरोपीस ६ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कागल तालुक्यात पाऊस पडला.पाठोपाठ आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील मुसळधार पाऊस झाला. या भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडल्याने नागरिक ,व्यापारी यांची तारांबळ उडाली. नंतर हवेत काहीसा गारवा जाणवत होता. रात्री इचलकरंजी, शिरोळ तालुक्यात जोरदार पाऊस पडला.

महिला जखमी

दरम्यान हत्तीवडे (तालुका आजरा) येथे एका वीट भट्टीवर काम करणारी अनसाबाई श्रीकांत चव्हाण (वय ३६, मूळ राहणार अलिबाग विजापूर)ही महिला अंगावर विजेची ज्वाला पडल्याने जखमी झाली. विजेच्या ताराखाली ही बाई ही महिला काम करत होती असे सांगण्यात आले. तिला आजरा येथील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याचे सरपंच सुहास जोंधळे यांनी सांगितले.

शेतकऱ्याचा मृत्यू

जोरदार पावसात वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा बळी घेतला. बाबुराव जाधव (वय ६१,रेठरे, ता. शाहूवाडी ) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

सर्वदूर पर्जन्यवृष्टी दरम्यान, आज दिवसभरात गगनबावडा, शाहुवाडी, आजरा, हातकणंगले , चंदगड,भुदरगड, राधानगरी, करवीर अशा सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस पडला. रात्री कोल्हापूर शहरात मुसळधार पाऊस झाला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain in kolhapur district farmer died due to lightning zws