कोल्हापूर : आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दमदार पाऊस झाला. पश्चिम घाटात जोरदार पाऊस झाला. सायंकाळी इचलकरंजी, कागल परिसरातही पावसाने हजेरी लावली. पावसामुळे तापलेला पारा कमी झाल्याने दिलासा मिळाला.

हेही वाचा – कोल्हापूर : डॉ. माणिकराव साळुंखे ,समीर गायकवाड, वनिता जांगळे, विठ्ठल खिल्लारी यांना दमसाचे ग्रंथ पुरस्कार जाहीर

Nitrate-rich groundwater in Wardha district
धक्कादायक! वर्धा जिल्ह्यातील भूगर्भात नायट्रेटयुक्त पाणी, कर्करोगासह विविध आजार…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
tabebuia rosea flowers Mumbai
निसर्गलिपी : बहराचा उत्सव
अग्रलेख : ‘मौसम’ है आशिकाना…
last two days temperature in Mumbai increased and dew in atmosphere has reduced
मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता
rain forecast for two days in vidarbha central maharashtra
विदर्भ, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम

हेही वाचा – राज्याची पहिलीच शाश्वत विकास परिषद २५ जूनला कोल्हापुरात; राजेश क्षीरसागर यांची माहिती

यावर्षी पावसाची सुरुवात चांगली झाली. मात्र जवळपास आठवडाभर पावसाने दडी मारली होती. यामुळे शेतकरी चिंतेत होता. दुसरीकडे पुन्हा उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. आज जिल्ह्याच्या बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावली. पश्चिम भागात दमदार पाऊस झाला. इचलकरंजीसह हातकणंगले तालुक्यात अनेक ठिकाणी तासभर पावसाने झोडपून काढले. त्यामुळे परिसर जलमय झाला. पावसाने उघडीप दिल्यानंतर रस्त्यावर गर्दी दिसू लागली. शाळा सुरू झाल्या असल्याने शालेय साहित्य घेण्यासाठी बाजारात गर्दी दिसू लागली. या पावसामुळे शेती कामालाही गती आली आहे. पावसाने सलग बरसत राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Story img Loader