कोल्हापूर : गेल्या चार-पाच दिवसांपासून परतीच्या पावसाचा कोल्हापूर जिल्ह्यात धुमाकूळ सुरू आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाने उसंत दिली नाही. संपूर्ण शहर जिल्हा जलमय झाला असून, जनजीवन विस्कळीत होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी पावसाने चांगला हात दिला. पंचगंगासह नद्यांना पूर आला होता. पावसामुळे पिकांचे उगवण चांगली झाली आहे. भात, सोयाबीन यासारखे पिके मळणीला आली असताना परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. काबाडकष्ट करून मिळवलेले पीक हातातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा >>>हाळवणकरांना विधान परिषदेला संधी, इचलकरंजीत राहुल आवाडे; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

गेले तीन दिवस संततधार कायम आहे. आज सकाळपासूनच दिवसभर वातावरण ढगाळ होते. अनेकदा ढगांच्या कडकडाटसह जोरदार पाऊस कोसळला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. नद्यांच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. जिल्हा प्रशासनाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain returns in kolhapur district kolhapur news amy