कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी जोरदार वारे, मुसळधार पावसाने झोडपून काढले. एक जूनलाच पावसाचे जोरदार आगमन झाल्याने शेतकरीतून स्वागत केले जात आहे. बाळूमामा मंदिर परिसराततील भाविकांसाठी उभारलेले छत कोसळले.
कोल्हापूर जिल्ह्यात सायंकाळी जोरदार पाऊस झाला. आधी वादळी वाऱ्याने दैना उडवली. वाऱ्याचा जोर इतका होता की अनेक गावातील घरे, दुकानावरील पत्रे उडून गेले. पावसाच्या सुरक्षेसाठी लावलेले प्लास्टिकचे पत्रे पाचोळ्यासारखे उडून गेले. भुदरगड तालुक्यात सर्जेराव रंगराव पाटील यांच्या घरावर विद्युत खांब कोसळून भिंत पडून मोठे नुकसान झाले. जीवन पाटील, गजानन पाटील यांच्या हरितगृहातला मोठा फटका बसला. सुमारे ५० ग्रामस्थांचे लाखोचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
हेही वाचा >>>कोल्हापूर: पावणे दोन कोटीच्या अपहार प्रकरणी बडा सुत व्यापारी पंकज अग्रवाल अटकेत
आदमापुर येथील संत बाळूमामा मंदिर मंदिरामध्ये उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंडप उभारणी केली आहे. वादळीवारा आणि पावसाच्या दणक्याने मंडप जमीन दोस्त झाला. मंदिर परिसरात पाणीच पाणी झाले होते. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी अशा पद्धतीने पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले.