कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या दुसऱ्याही दिवशी मुसळधार पाऊस झाला. पश्चिम घाटात पावसाचा जोर वाढला आहे. कागल तालुक्यात जोरदार प्रचंड पर्जन्यवृष्ठीमुळे शेतकामासाठी गेलेले लोक अडकून पडले असून बाळेघोल जवळच्या आंबेओहोळ ओढ्याला पूर आला. आज दुसऱ्या दिवशीही जिल्ह्याच्या बहुतांशी भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर शहरात दुपारपर्यंत उकाडा जाणवत होता सायंकाळी सात नंतर मात्र जोरदार पावसाने काही काळातच शहर जलमय झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तथापि, जिल्ह्याच्या पश्चिम घाटात मुसळधार पाऊस पडत आहे. गगनबावडा, भुदरगड, शाहूवाडी, चंदगड, करवीर, हातकणंगले तालुक्यात जोरदार पाऊस झाला.

हेही वाचा…कोल्हापुरात भाजप नेत्यांच्या पत्नीस २० लाखाचा गंडा

कागल ढगफुटी सदृश्य

कागल तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसाने झोडपून काढले. कापशी – गडहिंग्लज रस्त्यावर रस्त्यावर इतके पाणी साचले की या भागावरील वाहतूक खंडित झाली. सेनापती कापशी, हणभरवाडी ,बेरडवाडी येथे दोन तास पाऊस सुरू राहिला. तमनाकवाडा गावात ढगफुटी सदृश्य पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आहे. तुफान पावसांमुळे रानात,ओढ्यांत अडकलेल्या माणसांना दोर-वाल्याच्या सहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होते. ठिक-ठिकाणी लोक अडकून असल्याचे संदेश समाज माध्यमात येत होते. त्याद्वारे माणसे मदतीसाठी जात होती.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rainfall hits kolhapur district kagal tehsil particularly affected psg