कोल्हापूर:  इचलकरंजी येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असताना पंचगंगा नदीत कत्तलखान्यातील रक्त आणि मांसमिश्रीत सांडपाणी सोडून प्रदुषणात भरच घातली जात आहे. यास कारणीभूत असणारा कत्तलखाना बंद करण्यात यावा या मागणीसाठी सोमवारी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्यावतीने प्रांतकार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. १५ दिवसात कत्तलखाना बंद न झाल्यास कत्तलखान्यावर भव्य मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कोल्हापुरात लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीची तयारी जोमात

इचलकरंजी अ‍ॅग्रो फूडस् अ‍ॅण्ड ग्यामा एन्टरप्रायझेस या शेतीशी संबंधित काहीही प्रक्रिया होत नसणार्‍या कत्तलखान्यात दररोज सुमारे ४०० जनावरांची कत्तल केली जाते. त्यातून बाहेर पडणारे रक्त आणि मांसमिश्रीत पाणी विना प्रक्रिया ओढ्यावाटे नदीत मिसळुन प्रदुषण होत आहे. यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाचाही प्रश्‍न निर्माण होत असला तरी प्रशासनाचे दुर्लक्षच आहे. त्यामुळे समस्त हिंदूत्वनिष्ठ संघटनांनी आज कत्तलखाना हटाव-पंचगंगा बचावचा नारा देत शिवतिर्थापासून प्रांतकार्यालयावर मोर्चा काढला.. सुनिल घनवट, बाळ महाराज पंढरीनाथ ठाणेकर, दत्ता पाटील, प्रसाद जाधव,आनंदा मकोटे,  यांच्यासह कार्यकर्ते, नागरीक सहभागी झाले होते.

हेही वाचा >>> साखर उद्योगात चिंता; राजकारणी अस्वस्थ

कत्तलखान्याबाबत दिशाभूल बांधा-वापरा-हस्तांतरीत करा या तत्वावर चालवला जात असलेला इचलकरंजी अ‍ॅग्रो फुडस हा कत्तलखाना शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून चालवला जात आहे. यातून कोणतेही प्रदुषण केले जात नाही. दररोज कत्तलखान्याच्या उत्पन्नातून पशु संवर्धन खात्यास २० ते २५ हजार रुपये कर स्वरुपात भरले जातात. प्रप्तिकरही भरला जातो, असे असताना सामाजिक सलोका बिघडवण्याच्या उद्देशाने जनतेची दिशाभूल केली जात असल्याचे व्यवस्थापक परवेज गैबान यांनी सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindu organisations protest demanding to close slaughterhouse in ichalkaranji zws