कोल्हापूर : किल्ले विशाळगड त्वरित अतिक्रमण मुक्त करावा, अशी मागणी करीत रविवारी हिंदुत्ववादी कार्यकर्ते भर पावसात रस्त्यावर उतरले होते. महाआरती केल्यानंतर विशाळगड अतिक्रमणावरून न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी जलदगतीने व्हावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी बोलताना जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे म्हणाले की “किल्ल्यावर जवळजवळ १५६ अनधिकृत अतिक्रमणे आहेत. यात तीन मजली मशीद आहे तसेच मलिक रेहान दर्ग्याचे अतिक्रमण सुद्धा आहे. पुरातत्व खात्याच्या अंतर्गत किल्ला असताना रायगडावरचे राजगडावरचे एक दगड जरी हलवायचं म्हटलं तरी हजार परवानग्या शिवभक्तांना घ्यायला लागतात, मग ही अतिक्रमणे झाली कशी ? ही सगळी अतिक्रमणं त्वरित पाडली जावीत अशी सकल हिंदू समाजाच्या वतीने सरकारला मागणी आहे.” राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागरभैय्या बेग यांनी यावेळी सरकारने गड किल्ले संवर्धनासाठी समितीला दिलेल्या ८०० कोटी रुपयांच्या निधीतून काय कामे झाली याचा हिशेब द्यावा आणि त्या समितीकडून सर्वच गडांवरील अतिक्रमणांचा पाठपुरावा करावा अशी मागणी केली.

हेही वाचा…कोल्हापूर: हद्दपार संजय तेलनाडेचा इचलकरंजीत खुलेआम वावर; गुन्हा दाखल

यावेळी उपस्थित हजारो शिवभक्तांना शिवनिष्ठ बांदल घराण्यातील श्री अनिकेत बांदल, हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष श्री नितीन शिंदे यांनीही संबोधित केले. यावेळी स्थानिक कार्यकर्ते महेश विभुते, मानसिंग कदम, विशाल पाटील, आकाश पवार, ओंकार कारंडे, रुपेश वारंगे, तुषार पाटील तसेच सकल हिंदू समाज व समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, कोल्हापूर जिल्हा समन्वयक अनिरुध्द कोल्हापुरे, दीपक देसाई, कुंदन पाटील, गजानन तोडकर, अनिल दिंडे, आनंदराव पवळ, सोहम कुऱ्हाडे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून हजारो शिवभक्त आले होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindutva activists rally in heavy rain demand immediate removal of encroachments on vishalgad fort psg
Show comments