दारूच्या नशेत झालेल्या वादातून डोक्यात दगड घालून हॉटेल कामगाराचा सहकारी मित्रांनी खून केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी एकास सोमवारी अटक केली. संतोष रघुनाथ सोनवणे (वय २४, रा. बी वॉर्ड, जवाहरनगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. ११ एप्रिल रोजी राजेंद्र बाळकृष्ण पानसरे (वय २८, रा. बारामती) याचा मंचर (जि. ठाणे) येथील आशा हॉटेलमध्ये खून करण्यात आला होता. या प्रकरणी मंचर पोलिसांनी संतोषचा साथीदार कांताराम केदार मुरबाड याला अटक केली आहे.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
pune police commissioner amitesh kumar
“४५० ठिकाणचे CCTV, अपहरणासाठी वापरलेली कार अन्…”, पोलीस आयुक्तांनी सांगितलं सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांना कसं पकडलं?
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
Chennamaneni Ramesh BRS MLA
Chennamaneni Ramesh: भारतीय नागरिकत्व रद्द झालेले देशातील पहिले आमदार; कोण आहेत चेन्नमनेनी रमेश?
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”

मंचर (जि. ठाणे) येथील आशा हॉटेलमध्ये संतोष, राजेंद्र व कांताराम वेटर म्हणून कामास होते. सोमवारी रात्री उशिरा काम आटोपल्यानंतर तिघेही खोलीमध्ये मद्यप्राशन करत बसले होते. या वेळी दारूच्या नशेत या राजेंद्रचा संतोष व कांताराम यांच्यासोबत वाद झाला. यातून शाब्दिक चकमक उडाली. या रागातूनच चिडून संतोष व कांताराम यांनी राजेंद्रकुमारला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. संतोषने खोलीबाहेरील मोठा दगड उचलून राजेंद्रच्या डोक्यात घातला. यामध्ये राजेंद्र मृत झाला.

दोघांनी राजेंद्रचा मृतदेह शेजारीच असणाऱ्या कॅनॉलमध्ये फेकून दिला. यानंतर घटनास्थळी असलेले रक्ताचे डागही मिटवून टाकले. खुनानंतर पहाटेच्या सुमारास कांताराम व संतोषने हॉटेलमधून पलायन केले. मंचर पोलिसांनी कांतारामला अटक केली. मात्र संतोष घटनेनंतर पसार झाला होता. सोमवारी संतोषला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

तीन दिवस सीताफळाच्या झाडावर

राजेंद्र पानसरे याचा खून केल्यानंतर संतोष सोनवणे जवाहरनगर येथे राहण्यास आला होता. तो जास्तीत जास्त वेळ घरामध्येच बसून राहायचा. पोलीस आपल्याला पकडतील या भीतीने गेल्या तीन दिवसांपासून संतोष घराच्या मागे असणाऱ्या सीताफळाच्या झाडावर लपून बसला होता. सोमवारी पोलिसांनी संतोषला झाडावरूनच अटक केली.

Story img Loader