मोलकरणीवर बलात्कार प्रकरणी इचलकरंजी येथील इंदिरा कॉलनीतील अंकुश सखरामजी काचोळे या व्यवस्थापकास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. तो मुळचा सावेडी, अहमदनगर येथील रहिवाशी आहे. त्याला शनिवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पीडित महिलेची चार वर्षांपासून संशयित अंकुश काचोळे याच्याशी ओळख होती. अहमदनगरमध्ये पीडित महिला कामास होती. त्यावेळी काचोळे हा त्या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. ही कंपनी बंद पडल्यानंतर सात महिन्यांपूर्वी काचोळे याने संबंधित महिलेस फोन करून हातकणंगले येथील कंपनीत काम असल्याचे सांगितले. त्यानुसार पीडित महिला व तिचा पती कुटुंबीयांसह हातकणंगले येथे राहण्यास आले. तर हातकणंगले येथील एका फौंड्रीत काचोळे सध्या व्यवस्थापक म्हणून कामास आहे. पीडित महिला चार महिने एका फौंड्रीत कामासाठी जाते. काही दिवसांपूर्वी हे कुटुंब इंदिरा कॉलनीत भाडय़ाने राहण्यास आले. त्यावेळी संबंधित महिला अंकुश याच्या घरी साफसफाईचे काम करते होती. २१ मार्चला संशयित घरीच होता. त्यावेळी त्याने या महिलेस जबरदस्तीने घरातील खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. घडलेला प्रकार पतीस सांगून बदनामी करीन अशी धमकीही त्याने दिली. महिलेने फिर्याद दिल्याने काचोळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरारी होता. त्याला पोलिसांनी अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा