घरातील लोक सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडल्याची संधी साधून घरफोडी करणाऱ्या सराईत चोरटय़ास शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली.

रसुल अन्वय सय्यद (वय २३, रा. शाहू कॉलेजसमोर, विचारेमाळ) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने, मोबाईल असा सुमारे एक लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी व्हिनस कॉर्नर परिसरात पेट्रोलिंग करत असताना रसुल सय्यद संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. चौकशी केली असता रसुलने परिसरात घरफोडय़ा केल्याची कबुली दिली.

Story img Loader