कोल्हापूर : यंदाचा गळीत हंगाम सुरु करण्याबाबत शासनाचा अधिकृत निर्णय अद्याप झालेला नाही. तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते यावर्षीच्या गळीत हंगामातील शुंभारभ सोलापूर जिल्ह्यात विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्यात उद्या सोमवारी होत आहे. मंत्रीमंडळाची गळीत हंगामातील तारीख जाहीर होण्याआधीच पवार कसे हंगाम सुरु करू शकतात, अशी विचारणा राजू शेट्टी यांनी केली आहे. साखर हंगाम सुरु करण्याबाबत सर्वकाही निर्णय अजित पवार घेणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला मम् म्हणायचे काम करतील, असे दोन दिवसापूर्वी विधान केले होते. आता त्याची प्रचिती येत आहे, असा टोमणा शेट्टी लगावला आहे.

आक्रोश पदयात्रा उद्यापासून

ऊसाला दुसरा हप्ता ४०० रूपये देण्यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने उद्या सोमवारपासून आक्रोश पदयात्रा सुरु आहे. ५२२ किलोमीटर हि यात्रा निघणार आहे. गेल्या हंगामातील ऊसाला दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रूपये द्या, साखर कारखान्यांचे वजनकाटे ॲानलाईन करा आदी मागण्यासाठी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांवर संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी हे २२ दिवसाची पदयात्रा काढणार आहेत. सोमवारी सकाळी दत्त कारखाना, शिरोळ येथून ही पदयात्रा सुरू होणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी दिली.

Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Rahul Gandhi urges PM Modi to acknowledge the failure of the Make in India initiative.
Make In India योजना अपयशी? राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधानांनी मान्य करावे की…”
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
Cm Devendra Fadnavis in loksatta events
‘वर्षवेध’चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन; स्पर्धा परीक्षांचा ‘वाटाड्या’ पूर्णपणे नव्या स्वरूपात
Maharashtra Kesari 2025 Kustigir Parishad Offical Sandip Bhondave Statement on Shivraj Rakshe and Mahendra Gaikwad
Maharashtra Kesari 2025: “रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय पण…”, महाराष्ट्र केसरीमधील वादानंतर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य
Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस सगळा हिशेब मांडत म्हणाले, “धनंजय मुंडे पालकमंत्री असताना ७३ कोटी…”
Story img Loader