येथील सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकत्रे हुसेन जमादार यांनी गुरुवारी आत्महत्या केली. ते ७१ वर्षांचे होते. नराश्यातून त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्यांच्या पाíथवावर दफनविधी करण्यात आला.
उच्च विद्याविभूषित असलेले जमादार हे सामाजिक चळवळीत अग्रस्थानी असत. २२ वष्रे शिक्षकी पेशात असताना त्यांनी सामाजिक कार्याची धुरा वाहिली. विशेषत: मुस्लिम समाजातील कालबाह्य चालीरिती, रुढी विरोधी त्यांनी आवाज उठविला होता. हमीद दलवाई यांचा सहवास त्यांना लाभला होता. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे ते संस्थापक सभासद होते. गेली ४५ वष्रे या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य केले. १९८५ साली शाहबानो पोटगी प्रकरणाचा निकाल कायम राहावा याकरिता कोल्हापूर ते नागपूर तलाक मुक्ती मोर्चा त्यांनी काढला होता. हमीद दलवाईंची नास्तिकता नाकारून २० शाखाप्रमुखांसह त्यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाला सोडचिठ्ठी दिली होती.

Story img Loader