लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : मी ही मराठा आहे. आरक्षणासाठी आंदोलन केले आहे. गाव बंदी सारखा प्रकार चालणार नाही, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी आंदोलकांना उत्तर दिले.

सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलन सुरू असून नेत्यांना गावबंदी केली आहे. हळदी (ता. कागल) येथे एका कार्यक्रमासाठी खासदार संजय मंडलिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार आदी गेले होते. तेव्हा तेथील कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनांचा ताफा रोखून गावबंदीची माहिती दिली.

आणखी वाचा-कोल्हापूर : साखर कारखान्यांना ऊस देण्यासाठी शिरोळमध्ये आंदोलन

राजीनामा देण्याची तयारी

त्यांच्याशी संवाद साधताना खासदार मंडलिक म्हणाले, कोल्हापूर येथील सकल मराठा समाजाच्या आंदोलनात मी भाग घेतला होता. तेथेच खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी मुख्यमंत्र्यांकडे दर्शवली होती. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या दोन खासदारांनी आधीच राजीनामा दिला आहे. राजीनामा देऊन हा प्रश्न सुटणार नाही. यासाठी शासनाने चार डिसेंबर पर्यंत मुदत दिलेली आहे. लोकसभेचे अधिवेशन सुरू होत असून त्यामध्येही हा विषय पुन्हा उपस्थित करणार आहे. आरक्षण मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असताना गाव बंदी सारखा प्रकार सुरू आहे. मीही मराठा आहे याची जाणीव त्यांनी करून दिली.

धक्काबुक्की, शिवीगाळ

यावेळी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये वादावादी झाली. धक्काबुक्की, शिवीगाळ असा प्रकार घडल्याने तणाव निर्माण झाला होता.

Story img Loader