लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेली वीस वर्षे मी मंत्रिपदावर आहे. केवळ १४ महिनेच मला या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले. असे असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. यातून त्यांनी जिल्ह्याचे मंत्रिपद हुकल्याची सल अप्रत्यक्षपणे व्यक्त केली.

पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, आमच्याकडे श्रद्धा -सबुरी आणि नेत्यावरील निष्ठा असल्याने वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. मित्रपक्षांच्या शासनात अशा घटना घडत असताना संयमाने घेऊन आपले प्रश्न निकालात काढणे गरजेचे असते. सहपालकमंत्री ही गोष्ट नवीन आहे. यापूर्वी त्याच जिल्ह्यात एखादा दुसरा मंत्री असेल तर तो सहपालकमंत्री असायचा. मी मुंबईला परत गेल्यानंतर हा सहपालकमंत्री विषय काय आहे, हे नक्की समजून घेईन, असे ते म्हणाले.

आणखी वाचा-कोल्हापुरात मंत्री-पालकमंत्री पदावरून खदखद वेशीवर

समन्वयानेच लढू

कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री म्हणून कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची जबाबदारी उचलली आहे. एखाद्या प्रभागात महायुतीचे अधिक इच्छुक असल्याने उमेदवारांचा पराभव होणार असेल तर तिथे योग्य तो तोडगा काढू. मैत्रीपूर्ण लढतीही लढू. जिल्ह्यात या निवडणुका आम्ही समन्वयानेच लढू, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

Story img Loader