कोल्हापूर : गाय, म्हैशी म्हशी भर रस्त्यावर आणल्या आणि गेले पाच दिवस सुरू असलेले पाणंद रस्त्याचे आंदोलन इचलकरंजी महापालिकेने मागण्या मान्य केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी मागे घेण्यात आले. शेतकऱ्यांनी आंदोलन करूनही दाद मिळाली नाही पण जनावरे चौकात आल्यानंतर मात्र मार्ग निघतो असा आंदोलनाचा नवाच निष्कर्ष या निमित्ताने पुढे आल्याचे दिसून आले.
हेही वाचा >>> महाविकास आघाडीच्या प्रस्तावास छत्रपती संभाजीराजे यांचा नकार; स्वराज्यकडूनच लोकसभा लढणार
इचलकरंजीतील पाणंद रस्ते सुस्थितीत व्हावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उपोषण सुरू होते. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होते. आंदोलनाचे तीव्रता वाढवण्यासाठी आज दुपारी चार वाजता महात्मा गांधी पुतळा चौकात शंभराहून अधिक जनावरांचा कळप आणला. एकंदरीत गोंधळ उडाल्याने प्रशासनालाही जाग आली. उपायुक्त तैमूर मुल्लाणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी मागण्यात येईल. आमदार, खासदार यांच्याकडेही निधी मागितला जाईल असे आश्वासन दिले. तर, ४० डंपर मुरूम द्वारे काम सुरू करण्यात येत असल्याचे पत्र शहर अभियंता यांनी दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.