लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया एप्रिल महिन्यात पार पडल्यानंतर आता दख्खनचा राजा जोतिबा देवाची मूर्ती संवर्धन प्रक्रिया उद्या रविवार (७ जुलै) पासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया चार दिवस सुरू राहणार असल्याने गुरुवार ( ११ जुलै) पर्यंत देवाचे दर्शन बंद राहणार असल्याचे सूत्रांनी शुक्रवारी सांगितले.

tuljabhavani festival marathi news
घटस्थापनेने उद्यापासून शारदीय नवरात्रोत्सव; रंगरंगोटी, विद्युत रोषणाईने तुळजाभवानी देवी मंदिराला झळाळी
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Shahala masks, Uran, Navratri festival, loksatta news,
नवरात्रोत्सवात उरणमध्ये शहाळ्याच्या मुखवट्यांची परंपरा
Muhurta till 2 pm for ghatasthapna Navratri ten days due to increase of tritiya
घटस्थापनेसाठी दुपारी पावणेदोनपर्यंत मुहूर्त, तृतीयेची वृद्धी झाल्याने नवरात्र दहा दिवसांचे
Restoration of Shree Chatu Shringi Temple is nearing completion ahead of Sharadiya Navratri festival
पुणे : नवरात्रोत्सवापूर्वी चतु:शृंगी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम पूर्णत्वास,मंदिर रविवारपासून भाविकांना दर्शनासाठी खुले
After Diwali Jupiter will change Nakshatra
देवी लक्ष्मी देणार बक्कळ पैसा! दिवाळीनंतर गुरू करणार नक्षत्र परिवर्तन; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींची होणार भरभराट
Preparation of 204 artificial ponds for Ganesh immersion Municipal Corporation complete
मुंबई : गणेश विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव, महापालिकेची तयारी पूर्ण
Ganpati rangoli
मुलुंडमध्ये पस्तीस किलो साबुदाण्यापासून गणपतीची रांगोळी

आणखी वाचा-‘गोकुळ’च्या औषध खरेदी घोटाळ्याच्या पत्राने खळबळ ; संघाकडून इन्कार

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रशासक,कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी वाडी रत्नागिरी येथील श्री केदारलिंग देवस्थान मूर्ती सुस्थितीत राहण्याच्या अनुषंगाने पुणे पुरातत्त्व विभाग यांना पाहणी करण्यास कळवले होते. त्यावर पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालकांनी अहवाल दिला होता. या अहवालाच्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान देवस्थान समितीच्या वतीने ७ जुलैपासून केदारलिंग देवाच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया केली जाणार असून देवाचे दर्शन ११ जुलैपर्यंत बंद राहणार आहे.

या कालावधीत उत्सव मूर्ती व कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून भाविकांनी कासव चौकातून दर्शन घ्यावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केले आहे.