कोल्हापूर : केंद्रीय जल आयोगाच्या तत्वानुसार महाराष्ट्र-कर्नाटक राज्याने समन्वय ठेवून पावसाळ्यात धरणातील पाण्याचा विसर्ग केल्यास महापुराची तीव्रता कमी होऊ शकते , असे मत पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त प्रधान सचिव एम. के. कुलकर्णी यांनी नृसिंहवाडी येथे रविवारी सायंकाळी आयोजित केलेल्या तिसऱ्या पूर परिषदेत व्यक्त केले.आंदोलन अंकुश, कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती व स्पंदन प्रतिष्ठान सांगली यांचे वतीने येथे आयोजित तिसऱ्या पूर परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्ष स्थानी जलसंपदा विभाग सांगली चे विजयकुमार दिवाण हे होते.
पूरमुक्ती होईपर्यंत लढा कायम
स्वागत व प्रास्ताविक करताना आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चूडमुंगे यांनी शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला भेडसावणाऱ्या मानव निर्मित महापुरा पासून कायमची मुक्ती मिळावी यासाठी आंदोलन अंकुश, कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती यांच्या सहकार्याने गेले तीन वर्षांपासून शासनाला जागे करण्यासाठी पूर परिषदेचे आयोजन करत आहे. याद्वारे शासन दरबारी आवाज उठवून येथील जनतेची पुरापासून सुटका करण्याचा प्रयत्न करत असून संपूर्ण पुरमुक्ती होई पर्यंत पूरग्रस्त नागरिकांच्या सहकार्याने हा लढा सुरूच राहणार आहे असा विश्वास दिला.
हेही वाचा >>>राज्याची पहिलीच शाश्वत विकास परिषद २५ जूनला कोल्हापुरात; राजेश क्षीरसागर यांची माहिती
नदीतील अनधिकृत बांधकामे पाडणार
विजयकुमार दिवाण म्हणाले पावसाचा अतिरके केला तरी या पूर परिषदेच्या वतीने आम्ही शासनाला सतर्क ठेवत महापुरावर नियंत्रण ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार असून नागरिकानी पुरासाठी खचून जाऊ नये असे सांगून १९७६ साली राज्य शासनाने अध्यादेश पारित करून कृष्णा नदीतील अनधिकृत बांधकामे पाडावीत यासाठी हायकोर्टात अथवा सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची गरज नाही. असे असताना शासनाने कोणतीच पाऊले नउचललेने पूर परिषदेच्या माध्यमातून पूरग्रस्त नागरिकांच्या सहकार्याने ही बांधकामे पाडली जातील, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
जल संपदाचे सेवानिवृत्त उपअभियंता प्रभाकर केंगार यांनी सांगली व कोल्हापूर जिल्हाला भेडसावणारा पूर अलमट्टी धरणासोबतच हिप्परगी ब्यारेज कारणीभूत आहे मात्र कर्नाटक शासनाकडून केवळ अलमट्टी चा बागुलबुवा करून हिप्परगी ब्यारेज चे दरवाजे नाकाढता ५२४.१२ फुटावर पाणी साठविले जाते यामुळे महापुराचा धोका संभवत असून यावर आमचे लक्ष ठेवणार असलेचे नमूद केले.यावेळी नियंत्रण समितीचे सर्जेराव पाटील, प्रदीप वायचळ, बाळू संकपाळ आदींची भाषणे झाली.
आभार आंदोलन अंकुशचे दीपक पाटील यांनी मांनले. यावेळी सत्यजित सोमण, राकेश जगदाळे, भूषण गंगावणे , दीपक कबाडे, दादा गवळी, प्रशांत गवळी, पांडुरंग सुंठी, जितेंद्र चौगुले, एकनाथ माने, आशाराणी पाटील आदीसह पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.