कोल्हापूर : येथील अवनि या सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहणाऱ्या संस्थेच्या वतीने ‘ अरुणोदय ‘ हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या, तृतीपंथीप कल्याणकारी महामंडळाच्या माजी सदस्या एडवोकेट दिलशाद मुजावर यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजेंद्र गवस यांच्या हस्ते रोख १० हजार रुपये, सन्मानपत्र, मानचित्र अशा स्वरूपातील हा पुरस्कार त्यांचे पती एडवोकेट संजय मुंगळे, कन्या संजना मुंगळे हे स्वीकारणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुजावर यांनी बालकांच्या विविध कल्याणकारी योजना, शिक्षण, आरोग्य, बालकामगार प्रथा निर्मूलनाचे काम हे बाल कल्याण समिती सदस्य तसेच तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळ सदस्य या नात्याने केले. इचलकरंजीत ३०० तृतीय पंथीयांना मतदान, आधार , ओळखपत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. इचलकरंजी नगरपालिकेच्या अंदाजपत्रकात २५ लाखांची तरतूद तृतीयपंथीयांच्या अडचणी सोडवण्यासाठी करण्यात त्यांचा पुढाकार होता.

हेही वाचा : आरोग्य सेवा निर्देशांकामध्ये कोल्हापूर महानगरपालिका राज्यामध्ये प्रथम

यावेळी डॉ. रेश्मा पवार, आर. वाय. पाटील , मयुरी आळवेकर, प्रा. स्मिता वदन उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. उपाध्यक्ष संजय पाटील , प्रा. अर्चना जगतकर , साताप्पा मोहिते, जैतून पन्हाळकर, सुधा सुभाष आदी उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur arunoday award given to social worker dilshad mujawar css